Team Agrowon
लहान मुलांसाठीही नाचणी खाणे अत्यंत लाभदायक असते. वाढीचे वय असल्यामुळे त्यांचे पोषण चांगले होण्यास मदत होते.
भरड धान्ये ‘ग्लुटेन फ्री’ असतात. त्यामुळे गव्हा किंवा तांदळापेक्षा (Rice) जास्त आरोग्यपूर्ण असल्याने यांचे बारा महिने सेवन करू शकतो.
नाचणी लोहयुक्त असल्याने तिच्या नियमित सेवनाने शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते. म्हणून ज्याला रक्ताची कमतरता आहे अशांनी रोज नाचणीची भाकरी खायला हवी.
हिवाळ्यात बाजरीचे सेवन शरीरातील अंतर्गत उष्णता टिकवून ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
नाचणीमध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे प्रथिने, कर्बोदके, कॅल्शिअम आणि लोह यांचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे आपली हाडे आणि दात एकदम मजबूत राहतात.
गर्भवती महिलांसाठीही नाचणी अतिशय पौष्टिक समजली जाते. त्यामुळे अर्भकाची वाढ चांगली होण्यास मदत होते.