River pollution
River pollutionAgrowon

River Pollution : जिल्ह्यात आठ तालुक्यांत ‘नमामि चंद्रभागा’ अभियान राबविणार

ग्रामीण भागातील वाढत्या शहरीकरणामुळे होणाऱ्या मैलापाण्यामुळे नद्यांना प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे.

पुणे ः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाढत्या शहरीकरणामुळे (Urbanization) होणाऱ्या मैलापाण्यामुळे नद्यांना प्रदूषणाचा (River Pollution) धोका निर्माण झाला आहे. यामुळे झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या आठ तालुक्यांतील विविध ग्रामपंचायतींद्वारे ‘नमामि चंद्रभागा’ अभियान (Namami Chandrabhaga) राबविण्याचा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला आहे.

River pollution
River Revival : असे झाले होळणा नदीचे पुनरुज्जीवन

यासाठी नदीकाठच्या किमान १० हजार लोकसंख्या असलेल्या ३३ गावांची निवड केली आहे. यामध्ये भीमा, भामा, इंद्रायणी, पवना, मुळा, मांडवी, कुकडी, वेळ, मुळा-मुठा आदी नद्यांच्या काठावरील गावांचा समावेश आहे.

River pollution
River Conservation : नदी संवाद यात्रेत लोकसहभाग गरजेचा

...असा असणार प्रकल्प

- जिल्ह्यात पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने अंमलबजावणी करणार

- निवडलेल्या गावांमध्ये नदीपात्राच्या शेजारी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणार

- केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी ५० टक्के निधी उपलब्ध करून देणार

- पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचाही वापर करता येणार आहे.

- गाव आणि प्रकल्पनिहाय सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणार

- प्रकल्प अहवालांना तांत्रिक मान्यता घेणार

...ही आहेत गावे

शिरूर ः कोरेगाव भीमा, मांडवगण फराटा, शिक्रापूर, सणसवाडी व तळेगाव ढमढेरे

दौंड ः राहू, पाटस, कुरकुंभ, यवत, केडगाव, वरवंड

इंदापूर ः भिगवण, पळसदेव

हवेली ः पेरणे, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळीकांचन, कुंजीरवाडी

जुन्नर ः नारायणगाव, वारूळवाडी, ओतूर

खेड ः नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, खराबवाडी, कडूस

मावळ ः खडकाळे, इंदोरी, सोमाटणे, वराळे

मुळशी ः पिरंगुट, हिंजवडी, माण, भूगाव

गाव निवडीचे निकष

- गावाची लोकसंख्या किमान १० हजार अनिवार्य.

- नदीकाठावर गाव असावे.

- प्रकल्पासाठी नदीकाठावर पुरेशी जमीन उपलब्ध असावी.

- उपलब्ध जमीन ही पूरक्षेत्राच्या बाहेर असणे बंधनकारक.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com