
औरंगाबाद : ‘चला जाणूया नदीला’ अभियानामध्ये (River Campaign) जिल्ह्यातील शिवना, दुधना आणि खाम नदीचा समावेश करण्यात आलेला आहे. या अभियानांतर्गत ‘नदी संवाद यात्रे’चे (Nadi Samvad Yatra) यशस्वी आयोजन करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय (Astikkumar Pandey) यांनी दिले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘चला जाणूया नदीला’ या अभियानासाठी स्थापित जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्हाधिकारी म्हणाले, की प्रदुषणासारख्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भूपृष्ठजलाची उपयुक्तता घटत आहे.
नद्यांमध्ये तसेच जलाशयामध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वहन क्षमता तसेच साठवण क्षमता कमी झालेली आहे. या सर्व बाबींचा विचार करता नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी ‘चला जाणूया नदीला हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वप्रथम नदीचे आरोग्य जाणून घेऊन नदीचे आजार काय आहेत हे माहिती करून घेणे आवश्यक आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर सूक्ष्म कृती आराखडा बनवून तिन्ही नद्यांचे सर्व्हेक्षण करा. नदी संवाद यात्रेचे यशस्वी आयोजन करण्याचे निर्देश देखील यावेळी जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी दिले.
यावेळी खाम नदीच्या पुनरुजीवन अभियानाची ध्वनिचित्रफीत देखील उपस्थितांना दाखविण्यात आली. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, अभियानाचे समन्वयक गोकूळ सुरासे तसेच विविध यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.