Maharashtra Rain Update : कोकण, पूर्व विदर्भात मध्यम पावसाची हजेरी

Latest Rain Update : राज्यातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. कोकण, पूर्व विदर्भात काही ठिकाणी मध्यम पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on: 
Updated on: 

Pune News : राज्यातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. कोकण, पूर्व विदर्भात काही ठिकाणी मध्यम पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत.

खरिपातील पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस पोषक असल्याने पिके चांगलीच तरारली आहेत. खानदेश, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे.

कोकणात पावसाचा जोर कमी झाला असला तरी अनेक ठिकाणी पावसाची संततधार कायम आहे. घाटमाथ्यावर बऱ्यापैकी जोर कायम आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

रायगडमधील नाटे मंडलात ५७ मिलिमीटर पाऊस पडला. तर ठाणे, पालघर जिल्ह्यांत पावसाने चांगली उघडीप घेतली आहे. कोकणात भात लागवडी अंतिम टप्प्यात आहे.

Rain Update
Maharashtra Rain Update : जुलैमध्ये पावसाची दमदार हजेरी

मध्य महाराष्ट्रातही पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम पाऊस पडला. साताऱ्यातील महाबळेश्‍वर येथे ११२.८ मिलिमीटर पाऊस पडला. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक आहे.

त्यामुळे या भागातील अजूनही काही बंधारे पाण्याखाली आहेत. खानदेशातील सर्वच भागांत पाऊस नाही. नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडला. नगर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांतही ढगाळ वातावरण आहे.

Rain Update
Pune Rain Update : पुणे दोन महिन्यांत जिल्ह्यात सरासरी ७६ टक्के पाऊस

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडला तरी अनेक भागांत अधूनमधून तुरळक सरी कोसळल्या आहेत. मागील काही दिवस झालेल्या पावसामुळे पिकांवर रोग, किडीचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे.

विदर्भात अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मध्यम पाऊस पडला. भंडारा, गडचिरोलीत जोरदार पाऊस पडला. पश्‍चिम विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या.

गुरुवारी (ता.३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील पाऊस (४० मि.मी.पुढे) (मिलिमीटर) :

कोकण : महाड ४७.३, तुडील ४७.३, वाकण ४६.८, मेंढा ४६.३, आंबवली ५१, आंगवली ४६, पाचल ४२.५, भेडशी ४२.५, डहाणू ४४.८,

मध्य महाराष्ट्र : आंबवडे, निगुडघर ४१.८, वेल्हा ८७.५, दहिवड ४४.८, मेढा ४२, बामणोली ६७, हेळवाक ७१.३, मोरगिरी ७१.३, तापोळा, लामज ५७.८, साळवण ४०.८, कडेगाव ५३, चंदगड ५८.३.

विदर्भ : सेमडोह ४५.५, पाचखेडी ५१.८, शहापूर ५१.५, भंडारा ४२, बेला ४५, खोकार्ला ४३.८, वार्थी ४२.८, बारव्हा ६७.३, मुरमाडी ४२.५, चिंचगड ५७, बोधगाव देवी ४७, अर्जुनी ४५, महागाव, केशोरी ४१.३, घोटणगाव ४०, कुरखेडा ४४.८, काढोली ४३.८, अरमोरी ४१, पिसेवढथा ४०, वैरागड ४३.८, कोर्ची ४७.८, बेडगाव ४८, मासेली ५७.८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com