Maharashtra Rain Update : जुलैमध्ये पावसाची दमदार हजेरी

Maharashtra Monsoon Update : जून महिन्यात कमी पावसाने चिंता वाढवली होती. जुलैमध्ये पावसाने हा बॅकलॉग बराच भरून काढला आहे. या महिन्यात मासिक सरासरीच्या सुमारे १३० टक्के पाऊस झाला आहे.
Rain
RainAgrowon
Published on
Updated on

Akola News : जून महिन्यात कमी पावसाने चिंता वाढवली होती. जुलैमध्ये पावसाने हा बॅकलॉग बराच भरून काढला आहे. या महिन्यात मासिक सरासरीच्या सुमारे १३० टक्के पाऊस झाला आहे. सध्या पावसाचा जोर ओसरलेला असला तरी महिनाभरात १३ दिवस पाऊस झाल्याने पीक परिस्थिती समाधानकारक आहे. जिल्ह्यात जुलैमध्ये सरासरी २२३ मिमीच्या तुलनेत २९१ मिमी पाऊस झाला.

या हंगामात जूनमध्ये कमी पाऊस झाल्याने पेरण्या रखडल्या होत्या. जुलैमध्ये दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी दिल्याने पेरण्यांना वेग आला. त्यामुळे याच महिन्यात १०० टक्के पेरण्या आटोपल्या. जुलै महिन्यात २१ व २२ तसेच २७ जुलैला जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात अनेक भागांत अतिवृष्टीची नोंद झाली होती. या पावसाने तूट बरीच कमी केली.

Rain
Maharashtra Rain Update : कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस

तरीही जिल्ह्यात ५२ मंडलांपैकी सुमारे १४ मंडलांत सरासरीच्या कमी पाऊस झाला आहे. तर काही मंडलांत हा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या पावसामुळे प्रकल्पांतील साठासुद्धा वाढत चालला आहे.

प्रामुख्याने वाण, काटेपूर्णा, निर्गुणा, मोर्णा, उमा, दगडपारवा यासह इतर प्रकल्पात साठ्यात वाढ झालेली आहे. उमा प्रकल्प १०० टक्के भरला. वाणमध्येही ७० टक्क्यांपर्यंत साठा झाल्याने गेल्या आठवडाभरात दोन वेळा दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

पावसाने जुलैमध्ये दिलेल्या दमदार हजेरीमुळे खरिपातील सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांची जोमाने वाढ होऊ लागलेली आहे. सोबतच आता पावसाचा जोर ओसरल्याने आंतर मशागतीची कामे पुन्हा जोमाने सुरू झाली. प्रामुख्याने तणनाशकांची फवारणी अधिक होत आहे. काही ठिकाणी सोयाबीनमध्ये डवरणीचेही काम केले जात आहे.

Rain
Pune Rain Update : पावसाचा जोर ओसरल्याने धरणातील आवक घटली

अकोट तालुका पिछाडीवर

जिल्ह्यात एकीकडे जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी अकोट तालुक्यात मात्र पावसात तुट तयार झालेली आहे. अकोट मंडलात १८४. ४ मिमी (८२.५ टक्के), मुंडगाव १९६ (८८ टक्के), पणज १४३ (६४.३ टक्के), कुटासा १८७ (८३.९ टक्के), असेगाव १९१.८ (८५.३ टक्के), उमरा २०६ (९२.३),

अकोलखेड १४३ (६४.२ टक्के) पाऊस झाला. या तालुक्यातील एकमेव चोहोट्टा मंडला २८८ (१२८ टक्के) जुलैत पाऊस नोंद झाला आहे. मूर्तीजापूर तालुक्यातील लाखपुरी १३८ (६१.५ टक्के), शेलू १७४ (७७ टक्के), कुरुम २१६ (९६.१ टक्के), पातूर तालुक्यातील पातूर २१३.८ (७९.५ ट्कके), चान्नी २२९ (८५.२ टक्के), सस्ती २०९ (७७.९ टक्के), अकोला तालुक्यातील दहिहांडा १८९ (८५.२ टक्के) असे काही मंडले कमी पावसाची आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com