Measles Outbreak : ठाणे जिल्ह्यात गोवरछाया गडद

मागील दोन ते अडीच वर्षांपासून थैमान घालणाऱ्या कोरोनाच्‍या लाटेनंतर स्वाइन फ्लू आजाराने डोके वर काढले होते. या दोन्ही आजारांचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने आरोग्य यंत्रणांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता.
Measles
MeaslesAgrowon

ठाणे : मागील दोन ते अडीच वर्षांपासून थैमान घालणाऱ्या कोरोनाच्‍या (Corona) लाटेनंतर स्वाइन फ्लू (Swine Flue) आजाराने डोके वर काढले होते. या दोन्ही आजारांचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने आरोग्य यंत्रणांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. अशातच पुन्हा गोवर (Measles Outbreak) या आजाराने डोके वर काढले असल्याचे दिसून येत आहे.

Measles
Agriculture Electricity : शेतीसाठी दिवसा पूर्णवेळ वीजपुरवठा करा

ठाणे जिल्ह्यासह पालघर आणि रायगड जिल्ह्यामध्ये गोवरने बाधित बालकांची संख्या १२८ वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक ११० गोवरबाधित हे एकट्या ठाणे जिल्ह्यातील असून, भिवंडी तालुक्यातील एका बालकाचा गोवर आजाराने मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

Measles
Agriculture Business : महिला शेतकऱ्यांनी गांडूळ खत निर्मिती उद्योग सुरू करावा

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये गोवर बाधितांची संख्या अधिक असल्याचे सर्वेक्षणांतून दिसून आले आहे. ठाणे जिल्ह्यात गोवरबाधित आढळून आल्यानंतर आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली. त्यानंतर जिल्ह्यातील सहा महापालिकांसह ग्रामीण क्षेत्रात आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या सर्वेक्षणात एक हजार २०६ संशयित आढळून आले होते. त्यापैकी ८८८ जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामध्ये ११० जणांना गोवरची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

Measles
Agiculture Pump : वीजपंपाच्या सततच्या केबलचोरीने शेतकरी हैराण

पालघर जिल्ह्यातदेखील करण्यात आलेल्या सर्वेक्षणात २११ संशयित आढळून आले असून त्यापैकी १६२ जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामध्ये ११ जणांना गोवरचा संसर्ग झाला आहे; तर रायगड जिल्ह्यात १९४ संशयित आढळून आले असून त्यापैकी १४८ जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामध्ये सहा जणांना गोवरची लागण झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये या आजाराने एकही बालक दगावले नसल्याची नोंद करण्यात आली आहे.

लसीकरणाला विरोध नको

नागरिकांनी लसीकरणाला विरोध करणे घातक आहे. काही नागरिक बालकांनी लस घेण्यास विरोध करत असतील तर ते प्राणघातक ठरू शकते. आजार आणि लसीकरण याबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी जनजागृती आणि लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे.

गोवरची लक्षणे

ताप, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे, घशात दुखणे, अशक्तपणा, अंग दुखणे, तोंडाच्या आतील बाजूस पांढऱ्या रंगाचे चट्टे दिसणे अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या. गोवरसदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांनी घरगुती उपाय करण्यात वेळ न घालविता आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.

शहरी भागांमध्ये गोवरचा प्रादुर्भाव वाढत आहे. गोवर लसीकरण झाले नसेल तर ते तत्काळ करून घ्यावे. लसीकरणाची व्यवस्था जिल्हा आरोग्य केंद्रासह उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करण्यात आली आहे. गोवरची लक्षणे आढळली तर ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घ्यावा. मात्र त्यात विलंब झाला तर धोक्याचे ठरू शकते.

- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com