Agiculture Pump : वीजपंपाच्या सततच्या केबलचोरीने शेतकरी हैराण

भामा नदीकाठी असणाऱ्या गोनवडी, पिंपरी खुर्द (ता.खेड) येथे शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या केबलची पुन्हा एकदा चोरी झाली आहे.
Agricultural pump
Agricultural pumpAgrowon

आंबेठण, ता. खेड ः भामा नदीकाठी असणाऱ्या गोनवडी, पिंपरी खुर्द (ता.खेड) येथे शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या केबलची (Agriculture Pump) पुन्हा एकदा चोरी झाली आहे. मागील आठ ते दहा महिन्यांच्या कालावधीत चार ते पाच वेळा या ठिकाणी केबलची चोरी झाली आहे. रविवारी (ता. ७) झालेल्या चोरीत जवळपास १५ शेतकऱ्यांच्या केबलची चोरी झाली आहे. वारंवार होणाऱ्या केबल चोरीमुळे शेतकरी हैराण (Farmers Worried About Agriculture Pump Cable Theft) झाले आहेत.

Agricultural pump
वणी तालुक्‍यात कृषीपंप थकबाकी ३० कोटींवर 

गोनवडी आणि पिंपरी खुर्द गावांत जवळपास ८० टक्के क्षेत्र बागायती आहे. येथील भामा नदीवरून शेतकऱ्यांनी पाणी योजना राबविल्या आहेत. नदीकाठचा भाग निर्जन आणि झाडा-झुडपांचा असल्याने याचा फायदा घेत चोरटे या ठिकाणी डल्ला मारीत असतात. रविवारी (ता.७) झालेल्या चोरीत दोन्ही गावांतील मिळून जवळपास १५ शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्या असून, यात प्रत्येकी पाच ते सहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

यापूर्वी देखील चार-पाच वेळा अशा चोऱ्या झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या चोरीत येथे असणाऱ्या सामाजिक वनीकरण विभागाच्या मोटरची चोरी झाली होती. जवळच असणाऱ्या बोरदरा गावात देखील अशा चोऱ्या घडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

Agricultural pump
रुईखेड परिसरात कृषी पंप वीज तोडणीमुळे शेतकरी अडचणी

रविवारी (ता. ७) झालेल्या चोरीत बाजीराव बबन मोहिते, नारायण किसन मोहिते, बंडू उमाजी पवार, पोपट गणपत मोहिते, पांडुरंग नामदेव मोहिते, बाळासाहेब सुकाळे, नवनाथ बाळासाहेब मोहिते, मारुती गणपत मेदगे, बाळासाहेब मारुती मोहिते या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

वारंवार होत असलेल्या चोऱ्या आणि त्यातून शेतकऱ्यांना सोसावा लागणारा आर्थिक भुर्दंड पाहता तत्काळ चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच संदीप मोहिते पाटील आणि तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब मोहिते पाटील यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com