Bamboo Farming : देशातील बांबू फर्निचर उद्योगासाठी लोदगा आकर्षणाचे केंद्र

‘‘देशातील बांबू फर्निचर उद्योगासाठी लोदगा (ता. औसा, जि. लातूर ) हे आकर्षणाचे केंद्र बनेल,’’ असा विश्वास बांबू लागवड चळवळीचे प्रणेते माजी आमदार पाशा पटेल यांनी व्यक्त केले.
Bamboo Farming
Bamboo FarmingAgrowon
Published on
Updated on

लातूर ः ‘‘देशातील बांबू (Bamboo) फर्निचर उद्योगासाठी (Furniture Industry) लोदगा (ता. औसा, जि. लातूर ) हे आकर्षणाचे केंद्र बनेल,’’ असा विश्वास बांबू लागवड (Bamboo Cultivation) चळवळीचे प्रणेते माजी आमदार पाशा पटेल यांनी व्यक्त केले.

Bamboo Farming
Bamboo Farming: शेताच्‍या बांधावर बांबू लागवडीचे धोरण हवे

राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायतराज संस्था (हैदराबाद) या भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या संस्थेमार्फत बांबू क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या (एफ.पी.ओ.) प्रतिनिधीसाठी आणि स्टेट रूलर लाइव्हलीहूड मिशनच्या (एसआरएलएम) राज्याचे प्रमुख अधिकाऱ्यांसाठी हैदराबाद येथे ५ ते ९ डिसेंबर या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.

Bamboo Farming
Bamboo Farming : बांबूच्या मूल्यवर्धनासाठी बांधावर बांबू मिशन

या कार्यक्रमात देशातील ९ राज्यांतील एफ.पी.ओ.च्या २० प्रतिनिधींनी भाग घेतला होता. यामध्ये मेघालय, त्रिपुरा, आसाम, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगण इत्यादी राज्यांतील प्रतिनिधींचा समावेश होता. या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून या प्रशिक्षणार्थीना ७ डिसेंबर रोजी रोजी लोदगा (ता. औसा) येथील फिनिक्स फाउंडेशनच्या बांबू केंद्रास भेट व त्यांना एक दिवसाच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या वेळी सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी त्यांच्या बांबू क्षेत्रातील कामाची आणि बांबूचे महत्त्व समजून सांगितले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बांबू तज्ज्ञ संजीव करपे यांनी प्रेझेंटेशनद्वारे बांबूपासून जगभरात होणारे विविध प्रयोग आणि बांबूपासून बनणाऱ्या विविध वस्तूची माहिती दिली.

‘‘मेघालय, आसाम, त्रिपुरासांरख्या बांबू बहुल राज्यातून प्रतिनिधीनी लोदगा येथे प्रशिक्षण घेण्यासाठी फिनिक्स फाउंडेशनच्या बांबू केंद्रामध्ये येणे हा आमच्या जिल्ह्यासाठी व मराठवाड्यासाठी बहुमान आहे,’’ असेही म्हणाले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायत राज संस्था हैदराबादचे सहयोगी प्रा. सुरजित विक्रमन हे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com