Bamboo Farming : बांबूच्या मूल्यवर्धनासाठी बांधावर बांबू मिशन

बांबू पिकावर फारसा कीड, रोगांचा प्रादुर्भाव नसल्याने बदलत्या हवामानात हे पीक उपयुक्त ठरणार आहे. हवामान बदलाच्या काळात बांबू पीक फायदेशीर ठरेल.
Bamboo
BambooAgrowon
Published on
Updated on

कोल्हापूर : पारंपरिक बांबू लागवडीबरोबर (Bamboo Cultivation), बांबूला व्यावसायिक पीक (Bamboo Commercial Crop) म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी रोपनिर्मिती, लागवड, व्यापार व प्रक्रिया उद्योग अशा टप्प्यावर मूल्यवर्धन करणारे धोरण (बांबू मिशन) शेतकऱ्यांच्या बांधावर नेले जात असल्याचे महाराष्ट्र राज्य बांबू प्रमोशन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. गिरीराज यांनी सांगितले.

Bamboo
Bamboo Farming: बांबू पिकापासून अधिकच उत्पन्न कसं मिळणार ?

हुंबवली (ता. शाहुवाडी) येथे अरविंद कल्याणकर यांच्या बांबू लागवडीला श्री. गिरीराज यांनी भेट दिली. या वेळी बांबू डेव्हलपमेंट बोर्डाचे समन्वयक अजित भोसले प्रमुख उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे एक हजार एकरांवर बांबूची लागवड झाली आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना बांबू लागवड, संगोपन, रोपनिर्मिती आणि बांबू तोडणीबाबत प्रशिक्षण देण्यासाठी जानेवारीमध्ये तालुकानिहाय कार्यशाळा घेत असल्याचे गिरीराज यांनी सांगितले.

Bamboo
Bamboo Farming: शेताच्‍या बांधावर बांबू लागवडीचे धोरण हवे

बांबू पिकावर फारसा कीड, रोगांचा प्रादुर्भाव नसल्याने बदलत्या हवामानात हे पीक उपयुक्त ठरणार आहे. हवामान बदलाच्या काळात बांबू पीक फायदेशीर ठरेल. याच बरोबरीने हरित क्षेत्र वाढणार आहे. आता बांबू तोडणीला परवान्याची गरज नसल्याने सामान्य शेतकरी बांबू लागवडीकडे वळत आहेत, असे अजित भोसले यांनी सांगितले.

शाहुवाडी, गगनबावडा, चंदगड हे तालुके अतिवृष्टीचे, धुक्याचे असल्याने फळलागवडीपेक्षा बांबू लागवड फायदेशीर ठरेल, असे मत अरविंद कल्याणकर यांनी मांडले. आभार पाटलोबा पाटील यांनी मानले.

कोल्हापूर येथे गिरीराज यांनी जिल्ह्यातील बांबू उत्पादक आणि बुरूड समाजातील व्यावसायिकांच्या अडचणी समजावून घेऊन मार्गदर्शन केले. या वेळी मानस मंडलिक, प्रसाद रोटे, अमित पाटील, अद्वैत कल्याणकर, अनिकेत डोरले, श्याम सपाटे, अभिजीत सपाटे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com