Crop Insurance : मराठवाड्यातील प्रोत्साहनपर लाभाच्या यादीत लाखभर शेतकऱ्यांची कर्जखाती

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ वितरण सुरू करण्यात आला आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

औरंगाबाद : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Mahtma Jyotirao Phule Karjamukti Yojna) प्रोत्साहनपर लाभ वितरण सुरू करण्यात आला आहे. या लाभार्थीच्या पहिल्या यादीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील कर्ज भरणाऱ्या जवळपास एक लाखावर शेतकऱ्यांचा (Crop Insurance) समावेश आहे.

Crop Insurance
Indian Agriculture : शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील कर्मचाऱ्यांचे कापणार वेतन

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. या विषयाच्या योजनेची अंमलबजावणी सहकार विभागामार्फत सुरू करण्यात आली. राज्यभरातून पहिल्या टप्प्यात जवळपास ८ लाख २९ हजार प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र कर्ज खात्यांची यादी प्रसिद्ध केली गेली.

या यादीमधील आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत त्याची लाभाची रक्कम बँक बचत खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया २० ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली. यामध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून १ लाख १० हजार ३७७ कर्ज खात्यांचा प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्यांमध्ये समावेश आहे.

प्रोत्साहनपर लाभ कर्ज खात्यांवर पाठवण्याची प्रक्रिया २० ऑक्टोबरपासून सुरू झाली. औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास ९५ टक्के लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी दिली.

जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या सर्व कर्जखात्यांना प्रोत्साहनपर लाभासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. तत्परतेने शासन निर्देशानुसार प्रोत्साहन पर अनुदान शेतकऱ्यांच्या पात्र कर्ज खात्यांवर पाठविण्याची काम सुरू असल्याचेही श्री. दाबशेडे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com