Farmer Loan Waive : कर्जमुक्तीसाठी ‘आधार’ बॅंक खात्यास लिंक करा

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
Farmer Loan Waive
Farmer Loan WaiveAgrowon
Published on
Updated on

सांगली ः महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ (Farmer Loan Waive Scheme) अंतर्गत पीककर्जाची (Crop Loan) नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेच्या लाभाची रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या बचत खात्यामध्ये वर्ग होणार असून, शेतकऱ्यांनी आधार क्रमांक पाच सप्टेंबरपूर्वी बॅंक खात्यास लिंक (Aadhar Linking) करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व जिल्हा उपनिबंधक मंगश सुरवसे यांनी केले.

Farmer Loan Waive
Crop Loan : ‘पीडीसीसी’कडून ९६ टक्के पीककर्ज वाटप

जे शेतकरी वेळेत आधार जोडणी करणार नाहीत, ते लाभापासून वंचित राहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली. मृत सभासदांनी वारसाची नोंद करावी, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.

Farmer Loan Waive
Farmer Loan Waive : प्रोत्साहन अनुदान पात्रतेच्या जाचक अटी रद्द करा

कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. योजनेच्या अंमलबजावणीबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा झाली. ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक उपलब्ध नाहीत, अशा शेतकरी सभासदांची यादी गटसचिव व संबंधित तालुक्याच्या बँक अधिकाऱ्यांनी तयार करून ती संस्थेचे कार्यालय, ग्रामपंचायत, बँक शाखेच्या ठिकाणी शनिवारी (ता. २७) पूर्वी आधार कार्डची प्रत प्राप्त करून घेण्याबाबत तसेच आधार कार्ड नसलेल्या शेतकऱ्यास तत्काळ आधार क्रमांक काढण्यास सांगावे व मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक करण्यास सर्व शेतकऱ्यांना कळवावे, अशा सूचना दिल्या. नाव, जन्मतारीख, बचत खाते क्रमांक तसेच आधार क्रमांक अचूक असल्याची माहिती भरताना खात्री करण्यात यावी. मृत खातेदाराचा डाटा अपलोड करावयाचा नाही. तसेच, संयुक्त व मृत वारस कर्जखात्यांच्या बाबतीत प्रत्येक कर्जदाराचा कर्जामधील हिस्सा विवरणपत्रामध्ये नमूद केली असल्याची खात्री करावी.

कर्जमाफीचा लाभार्थी शेतकरीही योजनेस पात्र

२०१९ मध्ये आलेल्या महापुरामुळे बाधित झाल्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळालेला शेतकरीदेखील या योजनेकरिता पात्र आहे. प्रत्येक शेतकरी सभासदाचा मोबाइल क्रमांक उपलब्ध करून घेण्याबाबत तसेच बचत खाते काढून घेण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com