Bori Ambedari Project : बोरी-आंबेदरी प्रकल्पाविरोधात जलसमाधीचा प्रयत्न

मालेगाव तालुक्यातील बोरी-आंबेदरी बंदिस्त पाइपलाइन कालवा प्रकल्प होऊ नये यासाठी गेल्या ४० दिवसांपासून शेतकऱ्यांचे बेमुदत आंदोलन करत विरोध केला जात आहे; मात्र अस्ताने-राजमाने शिवरात प्रकल्पाचे कामकाज सुरू झाले आहे.
Bori Ambedari Project
Bori Ambedari ProjectAgrowon
Published on
Updated on

नाशिक ः मालेगाव तालुक्यातील बोरी-आंबेदरी (Bori Ambedari Project) बंदिस्त पाइपलाइन कालवा (Canal) प्रकल्प होऊ नये यासाठी गेल्या ४० दिवसांपासून शेतकऱ्यांचे बेमुदत आंदोलन (Farmer Protest) करत विरोध केला जात आहे; मात्र अस्ताने-राजमाने शिवरात प्रकल्पाचे कामकाज सुरू झाले आहे. त्यास विरोध करण्यासाठी मंगळवारी (ता. २०) शेतकऱ्यांनी बोरी-आंबेदरी प्रकल्पात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी उपस्थित असलेल्या पोलीस यंत्रणेने त्यांच्याशी चर्चा करून त्यांना रोखले, त्यामुळे अनर्थ टळला; मात्र दरम्यान महिला आंदोलक कल्पना राजेंद्र कचवे या बेशुद्ध पडल्याने गोंधळ उडाला.

Bori Ambedari Project
Irrigation Scheme : वैयक्तिक शेततळ्यांबाबत प्लॅस्टिक फिल्म नोंदणीचे बंधन

पालकमंत्री दादा भुसे यांच्या आदेशाने पोलीस प्रशासन या ठिकाणी शेतकऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी या वेळी केला. या वेळी पुरुषांसह महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. या वेळी प्रकल्पाकडे जलसमाधी घेण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले. या वेळी कल्पना राजेंद्र कचवे या वेळी बेशुद्ध झाल्या. यानंतर त्यांना मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Bori Ambedari Project
Koradi Irrigation : कोराडी सिंचन प्रकल्पाच्या सांडव्याच्या भिंतीला भगदाड

जलसमधी घेणे कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांशी संवाद साधल्याने अनुचित प्रकार टळला; मात्र जलसमाधी कुणी घेतली नाही. आंदोलक महिला बेशुद्ध पडली; मात्र उपचारानंतर ती ठीक असल्याचे अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी कळविले. ज्या-ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध त्या-त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा तैनात होती.

शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप

शेतकरी भूषण दगडू कचवे यांसह शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे न्यायप्रविष्ट प्रकरण निकाली निघेपर्यंत काम सुरू करू नये, अशी त्यांनी विनंती शासनास केली आहे. असे असतानादेखील काम सुरू करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे. या ठिकाणी अनुचित प्रकार घडला तर पाटबंधारे विभाग सर्वस्वी जबाबदार राहील, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे.

या कामला गालबोट लागू नये अशी भूमिका शेतकऱ्यांनी संयमाने घेतली होती. परंतु प्रशासनाने घाई करून तसेच राजकीय दबावाला बळी पडून हे आंदोलन दडपण्याचा प्रकार सुरू केला आहे.

- निखिल पवार, प्रमुख-आम्ही मालेगावकर संघर्ष समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com