Koradi Irrigation : कोराडी सिंचन प्रकल्पाच्या सांडव्याच्या भिंतीला भगदाड

हजारो नागरिकांची तहान भागवणाऱ्या कोराडी मध्यम सिंचन प्रकल्पाच्या सांडव्याच्या भिंतीत वाढलेली झाडेझुडपे तोडल्यामुळे भिंतीला भगदाडे पडली आहेत.
Koradi Irrigation
Koradi IrrigationAgrowon
Published on
Updated on

मेहकर, जि. बुलडाणा : हजारो नागरिकांची तहान भागवणाऱ्या कोराडी मध्यम सिंचन प्रकल्पाच्या (Koradi Irrigation Project) सांडव्याच्या भिंतीत वाढलेली झाडेझुडपे तोडल्यामुळे भिंतीला भगदाडे पडली आहेत. त्यातून झिरपणाऱ्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून दुरुस्तीची तातडीची गरज आहे. या भगदाडांमुळे प्रकल्पाच्या भिंतीला धोका निर्माण झाला आहे.

Koradi Irrigation
Irrigation : कल्पकतेतून केली सिंचनाची व्यवस्था

१९९० च्या दशकात कोराडी हा महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प बांधून तयार झाला होता. हे धरण मातीचे आहे. तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक जमिनीला सिंचन सुविधा आणि मेहकर शहरासह शंभरावर गावखेड्यांना या प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. त्यामुळे हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. यावर्षी प्रकल्प पूर्णपणे भरला आहे.

Koradi Irrigation
Rabi Irrigation : ‘उजनी’चे रब्बीचे आवर्तन १५ जानेवारीपासून

सांडव्याची भिंत मातीची आहे. काही बांधकाम सिमेंटमध्ये करण्यात आले आहे. सांडव्याच्या भिंतीत वाढलेली झाडेझुडपे तोडण्यात आल्याने त्याजागी भगदाडे पडली आणि त्यातून पाणी झिरपणे सुरू झाल्याने भिंत फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणाहून पाण्याचे पाझर सुरू झाल्याने त्वरित दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. पाण्याच्या मोठ्या अपव्ययामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

‘दुरुस्ती कामावर निगराणी ठेवणे गरजेचे’

मागील काळात कालवा दुरुस्तीसाठी मोठा निधी शासनाने सिंचन विभागाला दिला होता. परंतु थातुरमातूर कामे करण्यात आल्याने शेती सिंचनासाठी पाणी सर्व भागात जाऊ न शकल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता. तक्रारी करूनही चौकशी, कार्यवाही झाली नाही.त्यामुळे आता सांडवा भिंतीच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला तरी हे काम केले जाईल की नाही याबाबत जनतेत साशंकता आहे. वरिष्ठांनी दुरुस्ती कामावर निगराणी ठेवणे गरजेचे राहणार आहे. प्रकल्पाचे स्थानिक अधिकारी सांडव्याला पडलेल्या भगदाडांच्या दुरुस्तीबाबत बोलायला तयार नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com