
Maharashtra Dam News : नाशिक जिल्ह्यात शुक्रवारपासून दमदार पावसाने हजेरी लावली. धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूरसह अन्य धरणांमधून विसर्ग करण्यात आल्याने जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. मात्र, पावसाने विश्रांती घेतल्यानंतर जायकवाडी धरणात येणारी आवक देखील घटली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात सध्या 34.28 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
यंदा मान्सूनच्या पावसाचे उशिरा आगमन झाले. त्यात मराठवाड्यात जून आणि ऑगस्ट महिना कोरडा गेला. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहेत. पावसात मोठा खंड झाल्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात देखील झपाट्याने घट होत गेली. त्यामुळे औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांचे चिंता वाढली होती.
गेल्या तीन-चार दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. तसेच गोदावरी नदीला पूर आल्याने जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरु झाली होती. रविवारी संध्याकाळी 6 वाजता धरणात 15 हजार 925 क्युसेकने पाण्याची आवक सुरु होती. मात्र, आजपासून पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात येणाऱ्या पावसाची आवक घटली असून, 13 हजार 78 क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे.
जायकवाडी धरणाची पाणीसाठा परिस्थिती (सकाळी 6 वाजेपर्यंत)
धरणाची पाणी पातळी फुटामध्ये : 1507.18 फूट
धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये : 459.388 मीटर
एकूण पाणीसाठा दलघमी : 1482.335 दलघमी
जिवंत पाणीसाठा दलघमी : 744.229 दलघमी
जायकवाडी धरणाची पाणीसाठा टक्केवारी : 34.28टक्के
जायकवाडी धरणात पाण्याची आवक : 13 हजार 78 क्युसेक
जायकवाडी धरण बाष्पीभवन : 0.583
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.