Rain : धरणांतून विसर्गात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात श्रावणधारांनी चांगलाच जोर धरला आहे. यामुळे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
Pune Dam Water
Pune Dam WaterAgrowon
Published on
Updated on

पुणे : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात (Dam Catchment Area) श्रावणधारांनी चांगलाच जोर (Rainfall) धरला आहे. यामुळे धरणातील पाणी पातळीत (Water Level In Dam) झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत जवळपास १९ धरणे (Dam Overflow Pune) भरली आहेत. त्यापैकी १६ धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून, पावसाच्या पाण्याच्या येव्यानुसार टप्याटप्याने या विसर्गात वाढ करण्यात येत असल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात १७० मिलिमीटर पाऊस पडला. तर वडीवळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १०७ मिलिमीटर पाऊस पडला. वरसगाव धरणाच्या पालणोट क्षेत्रात ८९, पवना ८८, पानशेत ८०, नीरा देवघर ७७ मिलिमीटर पाऊस पडला. तर कळमोडी २९, कासारसाई २८, आंध्रा २१, खडकवासला १८, भाटघर १६, पिंपळगाव जोगे १४, डिंभे १६, चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १३ मिलिमीटर पाऊस पडला. तर भामा आसखेड, शेटफळ, नाझरे, वीर, येडगाव, वडज, गुंजवणी, घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या तुरळक बरसल्या.

Pune Dam Water
Water Storage:पुणे जिल्ह्यातील अकरा धरणे भरली

जोरदार पावसामुळे मुळशी धरण जलाशय पातळी गुरुवारी सकाळी ७ वाजता ६०५.७० मीटरवर पोहोचली असून, संबंधित जलाशय साठा ५०६.५२ दलघमी आहे. धरण ८८.७४ टक्के क्षमतेने भरले आहे. धरण पाणलोट परिसरात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होत असून गेल्या २४ तासांत दावडी पर्जन्यमापक केंद्रात ३०४ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तसेच गेल्या २४ तासांत एकूण ४९.४९ दलघमी आवकाची नोंद झालेली आहे. भामा आसखेड प्रकल्पातून भामा नदी पात्रात होत असलेला विसर्ग १ हजार २२८ क्युसेकवरून वाढवून २ हजार ४३५ क्युसेक एवढा करण्यात येणार आहे.

Pune Dam Water
Rice Export : भारतातील बासमती तांदळाला मागणी वाढली

पानशेत धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे १०० टक्के भरले असल्याने पानशेत धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग गुरुवारी सकाळी १०:१५ वाजता १८ हजार ७८४ क्युसेक करण्यात आला. खडकवासला धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे दुपारी १२ दरम्यान खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये साधारण ३ हजार ४२४ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला. येत्या काही दिवसांचा भारतीय हवामान खात्याचा अंदाज, सद्यःस्थितीतील पर्जन्यमानाचा कल पाहता पुढील काही काळात आवश्यकतेनुसार धरणाच्या सांडव्यावरून नियंत्रित विसर्ग सोडण्यात येणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी केले.

गुरुवारी (ता. ११) सकाळी आठ वाजता सुरू असलेला धरणनिहाय विसर्ग, क्युसेकमध्ये : पानशेत ९७७, खडकवासला १५०३, कासारसाई ७११, कळमोडी ९७६, चासकमान ५४६०, भामा आसखेड १२२८, आंध्रा १४९८, वडीवळे १३७६, गुंजवणी ४५३१, वीर २५,६८७, येडगाव १४००, वडज १४९०, चिल्हेवाडी २०७४, घोड ६५५५, विसापूर ९०, उजनी १००२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com