Rice Export : भारतातील बासमती तांदळाला मागणी वाढली

बांगलादेशातील पूरपरिस्थितीच्या नैसर्गिक आपत्तीमुळे तांदळाच्या उत्पादनात घट झाल्यामुळे बांगलादेशने भारताकडून तांदूळ खरेदी वाढवली आहे.
Rice Export
Rice ExportAgrowon
Published on
Updated on

पुणे ः बांगलादेशातील पूरपरिस्थितीच्या नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural Calamity In Bangaladesh) तांदळाच्या उत्पादनात (Rice Production) घट झाल्यामुळे बांगलादेशने भारताकडून तांदूळ खरेदी (Rice Procurement) वाढवली असून, चीनकडून उपपदार्थांसाठी होणारी तांदळाच्या कणीची मागणी या कारणांबरोबरच जगभरातील १५० पेक्षा जास्त देशांतून भारतातील तांदळाला मागणी (Rice Demand) वाढली आहे. यामध्ये सर्वाधिक मागणी बासमती तांदळाला (Basamati Rice) असली तरी बिगर बासमतीला देखील मागणी वाढल्याने मागील दोन महिन्यांत तांदळाच्या भावात सुमारे २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती तांदळाचे निर्यातदार राजेश शहा यांनी दिली.

Rice Export
Rice: लवकरच येणार भाताचे दुष्काळप्रतिबंधक वाण

शहा यांच्या माहितीनुसार बांगलादेश भारतातून नियमित तांदूळ आयात करणारा ग्राहक देश नाही; मात्र या वर्षी बांगलादेशातील नैसर्गिक आपत्तीमुळे तांदळाचे उत्पादन घटल्याने त्यांनी या वर्षी भारताकडून मोठ्या प्रमाणात तांदूळ खरेदी केला आहे. बांगलादेशातील तांदळाच्या टंचाईमुळे बांगलादेश सरकारने तांदळावरील आयात शुल्कदेखील घटवल्याने भारतातून निर्यात वाढली आहे. तसेच जगात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन घेणारा देश चीनदेखील सध्या भारताकडून तांदळाची आयात करीत आहे. चीन भारतातून अख्ख्या तांदळाऐवजी कणी (तुकडा) खरेदी करीत आहे. यापासून ते पीठ करून त्यापासून राइस प्रॉडक्ट्स बनवून जगभरात विकत आहे. त्याचबरोबर इराण, इराक आणि सौदी अरेबिया या देशांकडूनही भारतातील तांदळाला मागणी वाढली आहे. यामध्ये प्रामुख्याने बासमती व शेला बासमती तांदळाला मोठी मागणी आहे. त्यामुळेही तांदळाच्या भाववाढ झाली आहे.

Rice Export
Rice : आता तांदूळही महाग होणार?

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार भारताने २०२१-२२ वर्षात जगभरातील सुमारे १५० हून अधिक देशांना तांदळाची निर्यात केली. त्यातून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त झाले आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०२०-२१ मध्ये झालेल्या १३० लाख टन बिगर बासमती तांदळाच्या तुलनेत या वर्षी २०२१-२२ मध्ये नॉन बासमती तांदळाच्या निर्यातीत ३० टक्क्यांनी वाढ होऊन ही निर्यात १७० लाख टन झाली आहे. मागील वर्षी (२०२०-२१) झालेल्या निर्यातीचे मूल्य ३५ हजार ५०० कोटी रुपये होते. तर या वर्षी (२०२१-२२) झालेल्या बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीचे मूल्य ४५ हजार कोटी रुपये झाले आहे.

मागील दोन महिन्यांत तांदळाच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. बासमतीच्या विविध प्रकारांत दहा ते पंधरा रुपये, कोलमच्या दरात सात-आठ रुपये, आंबेमोहोरच्या दरांत दहा रुपये आणि बासमती तुकडा-कणीच्या दरांत पाच रुपयांनी वाढ झाली आहे.
राजेश शहा, तांदळाचे व्यापारी, मार्केट यार्ड

दरवाढीची कारणे

- बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्‍चिम बंगाल, पंजाब, हरियाना या राज्यांत तांदळाची लागवड १० ते १२ टक्क्यांपर्यंत कमी

- देशभरातील भाताची लागवड ३८ लाख हेक्टरने कमी झाल्यामुळे उत्पादनात घट

- बांगला देशातून खरेदीमध्ये वाढ

- प्रक्रिया उद्योगासाठी चीनकडून तांदळाच्या कणीची (तुकडा तांदूळ) मागणी

- निर्यातीमध्ये सातत्याने वाढ

घाऊक बाजारातील प्रतिकिलो दर (रुपयांमध्ये)

तांदळाचा प्रकार दर (दोन महिन्यांपूर्वी) दर (आताचे)

बासमती --- १०० --- १२०

पूसा बासमती -- ६० -- ८०

आंबेमोहोर ६० ते ६५ --- ८०

बासमती तुकडा ३० ते ३२ --- ४०

मसुरी व डॅश २७ ते ३० --- ३५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com