Water Level : सांगली जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात व परतीचा पाऊस यामुळे तलाव, विहिरींच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असल्याने भूजल पातळीत वाढ झाली आहे.
Water Level
Water LevelAgrowon
Published on: 
Updated on: 

सांगली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात व परतीचा पाऊस (Rain) यामुळे तलाव, विहिरींच्या पाणीसाठ्यात (Water Stock) लक्षणीय वाढ झाली असल्याने भूजल पातळीत (Groundwater Level) वाढ झाली आहे. यंदा ऑक्टोबर-२०२२ अखेर जिल्ह्यातील भूजल पातळीत ०.९७ मीटरने वाढ झाली असल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयातून देण्यात आली.

Water Level
Crop Insurance : देशातून सर्वाधिक महाराष्ट्रात ५५ लाख सूचनांची घेतली दखल

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयामार्फत ऑक्टोबर २०२२ अखेर जिल्ह्यातील ८६ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये ऑक्टोबर-२०२२ मध्ये २.६८ मीटर स्थिर भूजल पातळी आढळून आली. ही वाढ सरासरी ०.९७ मीटर आहे. यामध्ये मिरज तालुक्यातील ६ विहिरींची तपासणी करण्यात आली असता, स्थिर भूजल पातळी २.४५ मीटर असून ऑक्टोबरअखेर ०.१३ मीटरची वाढ आढळून आली.

जत तालुक्यातील २० विहिरींची तपासणी करण्यात आली असता, स्थिर भूजल पातळी ३.३९ मीटर असून ऑक्टोबर-२०२२ अखेर १.८५ मीटरची वाढ आढळून आली. खानापूर तालुक्यातील ९ विहिरींच्या तपासणीत स्थिर भूजल पातळी २.९४ मीटर असून, ऑक्टोबरअखेर १.१३ मीटरची वाढ आढळून आली. वाळवा तालुक्यातील ६ विहिरींची तपासणी केली, स्थिर भूजल पातळी १.६१ मीटर, तर ऑक्टोबरअखेर ०.३३ मीटरची वाढ आढळली.

तासगाव तालुक्यातील ३ विहिरींची तपासणी झाली, स्थिर भूजल पातळी ४.४२ मीटर, तर ऑक्टोबरअखेर १.३१ मीटरची वाढ आढळली. शिराळा तालुक्यातील ६ विहिरींच्या तपासणीत स्थिर पातळी ०.८९ मीटर व ऑक्टोबरअखेर ०.२१ मीटरची वाढ आढळली. आटपाडी तालुक्यातील १३ विहिरींची तपासणी केली, स्थिर पातळी ३.२९ मीटर, तर ऑक्टोबरअखेर १.०९ मीटरची वाढ झाली.

कवठे महांकाळ तालुक्यातील १५ विहिरींच्या तपासणीत स्थिर पातळी २.६७ मीटर, तर ऑक्टोबरअखेर १.८५ मीटरची वाढ झाली. पलूस तालुक्यात २ विहिरींच्या तपासणीनंतर स्थिर पातळी १.४५ मीटर, तर ऑक्टोबरअखेर १.१५ मीटरची वाढ आढळली. कडेगाव तालुक्यातील ६ विहिरींची तपासणी केली असता स्थिर भूजल पातळी ३.६५ मीटर असून, ऑक्टोबर २०२२ अखेर ०.६३ मीटरची वाढ आढळून आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com