Crop Damage
Crop Damage Agrowon

Crop Insurance : देशातून सर्वाधिक महाराष्ट्रात ५५ लाख सूचनांची घेतली दखल

शेतकऱ्यांना त्यांच्या पीक नुकसानीची योग्य भरपाई मिळावी यासाठी कृषी विभाग सातत्याने काम करीत आहेत. देशात सर्वाधिक ५५ लाख सूचनांची आपल्या राज्यात दखल घेण्यात आली.
Published on

अकोला ः शेतकऱ्यांना त्यांच्या पीक नुकसानीची (Crop Damage Compensation) योग्य भरपाई मिळावी यासाठी कृषी विभाग (Agriculture Department) सातत्याने काम करीत आहेत. देशात सर्वाधिक ५५ लाख सूचनांची आपल्या राज्यात दखल घेण्यात आली. पीकविम्याची (Crop Insurance) मदत ही विमा काढलेले क्षेत्र, पिकाची तेंव्हाची अवस्था आणि जेव्हढे पीक क्षेत्र बाधित झाले त्याची साधारणपणे टक्केवारी अशा काही मुद्द्यांना धरून निश्‍चित होत असते, अशी माहिती कृषी आयुक्तालयातील कृषी सहसंचालक तथा मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे (Vinaykumar Awate) यांनी दिली.

 Crop Damage
Crop Insurance : तुटपूंजी पीक भरपाई परत केली विमा कंपनीला

आवटे म्हणाले, की कृषी विभाग राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची अधिकाधिक भरपाई मिळवून देण्यासाठी सातत्याने काम करीत आहे. यंदाच्या हंगामात प्राप्त झालेल्या सुमारे ५५ लाख सूचनांची दखल घेण्यात आली आहे. विमा भरपाईचे वाटप सुरू असून पीकनिहाय टप्पे जात आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांना एकत्रित विमा रक्कम अधिक असतानाही पिकानुसार पैसे खात्यात जमा होत असल्याने ती कधी कमी-जास्त दिसून येण्याची शक्यता आहे. पैसे जमा होण्याची ही संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे.

 Crop Damage
Crop Insurance : साडेसहा लाख शेतकऱ्यांना विमाभरपाई अदा

कुठल्याही शेतकऱ्याचे नुकसान झाले मात्र लाभ मिळाला नाही, असे होऊ दिले जात नाही. बऱ्याच शेतकऱ्यांनी खरिपात सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कपाशी अशा विविध पिकांसाठी वेगवेगळ्या क्षेत्राचा विमा काढला होता. त्यांनी दिलेल्या सूचनांची दखल घेऊन स्थानिक यंत्रणांनी पंचनामे केले.

क्षेत्र, पिकाची अवस्था, नुकसानग्रस्त क्षेत्रातील पिकाची नुकसान पातळी अशा विविध मुद्यांचा आधार घेत विमा भरपाई निश्‍चित झाली. याहीवेळी अशा प्रकारची प्रक्रिया केली जात आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पिकांच्या लॉटनुसार पैसे जमा होत आहेत. तेल्हारा तालुक्यातील शेतकरी सुरेश अडकने यांना विम्याचे टप्पे जमा होत आहेत. त्यांना एकूण १५ हजार नऊ रुपये पीकविमा मंजूर झालेला आहे, असेही श्री. आवटे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com