सातारा जिल्ह्यात पिकांवर हुमणी, लोकरी मावा

जिल्ह्यातील पिकांवर लोकरी मावा व हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. ऊस, आले, सोयाबीन पिकावर त्याचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे.
Sugarcane
Sugarcane Agrowon
Published on
Updated on

सातारा ः ‘‘जिल्ह्यातील पिकांवर लोकरी मावा व हुमणी किडीचा प्रादुर्भाव (Humani Outbreak) झाला आहे. ऊस, आले, सोयाबीन पिकावर (Soybean) त्याचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिके कमी अधिक स्वरूपात हुमणी व माव्याच्या विळख्यात (Crop Damage) आली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वातावरणात सातत्याने होत असलेला बदल व कमी पावसामुळे हुमणीचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यात खरीप पिकांची ८० टक्‍क्‍यांवर पेरणीची कामे उरकली आहेत. त्यापैकी भात, भूईमुगासह आले व ऊस पिकात हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. वातावरणात होत असलेल्या बदल तसेच अपुरा पाऊस यामुळे या पिकांवर प्रादुर्भाव वाढू लागला आहे. पीक पिवळे पडणे, रोपांना मर लागणे ही लक्षणे हुमणीमुळे दिसून येत आहेत. नदी काठच्या क्षेत्रावरील पिकांत हा प्रादुर्भाव जास्त आहे. अगदी पाच ते सहा फूट उंचीचे ऊस पीक हुमणीच्या प्रादुर्भावाने एन पावसाळ्यात वाळत आहेत. आले पिकात हुमणीच्या प्रादुर्भावामुळे कंदकुज होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून आळवण्या केल्या जात आहेत.

Sugarcane
Humani : हुमणी’चा प्रादुर्भाव सुरू

नुकत्याच लागवड झालेल्या आडसाली उसातही हुमणीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. कीड नियंत्रणात येत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. किडी नियंत्रण करण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करणे आवश्‍यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

आंतरमशागतीची कामे सुरू असून भांगलण करत असताना हुमणी वर दिसत आहे. पुढील काळात दमदार पाऊस न झाल्यास या दोन्ही किडीचा प्रादुर्भाव वाढून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून फवारण्या केल्या जात आहेत. मात्र रासायनिक कीटकनाशकांमुळे मित्रकिडीही नष्ट होत असल्याने जैविक फवारण्या करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Sugarcane
Sugarcane : ऊस पक्वता काळाचा अभ्यास महत्त्वाचा....

सोयाबीनलाही फटका

ऊस, आले या नगदी पिकांबरोबर सोयाबीन हे देखील जिल्ह्यातील प्रमुख पीक झाले आहे. यामुळे पिकांचे क्षेत्रही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भांडवलीखर्च वाढला आहे. मात्र ही प्रमुख पिके आता हुमणी आणि लोकरी माव्याच्या विळख्यात सापडली आहेत. यामुळे या प्रमुख पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

ज्या भागात हुमणीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तेथे लोकरी माव्यासाठी कृषी विभागाकडून बैठकीचे आयोजन करून जागृती करून उपाययोजना केल्या जात आहेत. हुमणीसाठी या अगोदर साडेपाच हजार प्रकाश सापळे लाऊन भुंगेरे नियंत्रण करण्याचे प्रयत्न केले होते. सध्याही बैठकांमधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
विजयकुमार राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा.
तीन एकर ऊस पिकात हुमणी आणि लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे. नदी काठच्या परिसरात हुमणीचा प्रादुर्भाव जास्त आहे. हुमणी नियंत्रणात न आल्यास बाधित झालेला ऊस चाऱ्यासाठी पाठवावा लागेल.
विश्वास जाधव, काशीळ, जि. सातारा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com