Maharashtra Rain Update : मराठवाडा, विदर्भ, कोकणात अतिवृष्टी

Latest Rain Update : कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. विदर्भातील अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस कोसळत आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

Pune News : कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. विदर्भातील अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी २०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला आहे.

तर सव्वाशे मंडलांहून अधिक ठिकाणी शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. दरम्यान, कोकणातील नद्या ओसंडून वाहत आहे. धरणांतून विसर्ग कायम असल्याने भीमा खोऱ्यातील नद्यांची पातळी स्थिर आहे. यामुळे काही धरणे भरली असून, अनेक धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढत आहे.

राज्यात बारा ते तेरा दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणात पावसाचा जोर अधिक आहे. पालघर जिल्ह्यातील कसा मंडलात सर्वाधिक २७५.८ मिलिमीटर पाऊस पडला असून, साईवन २१४.८, उल्हासनगर, अंबरनाथ २०३.३, विक्रमगड २२१.५, मोखडा २०५, तळवाडा २१४.८, गोळेगाव २०२.३, दाभड २५५.५, मालेगाव येथे २१६.५ मिलिमीटरचा सर्वाधिक पाऊस पडला.

Rain Update
Pune Rain Update : सर्वदूर संततधार

यामुळे कोकणातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारी (ता. २८) सकाळपासून कमी झाला आहे. मात्र गुरुवारी (ता. २७) झालेल्या पावसामुळे खारेपाटण शहरात पुराचे पाणी शिरले असून, शेकडो एकर शेती पुराच्या पाण्याखाली आहे. जिल्ह्यात इतरत्र जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे; मात्र पूर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. रत्नागिरीतील काजळी, राजापुरातील कोदवली आणि संगमेश्‍वरमधील शास्त्री, सोनवी आणि बावनदीचा पूर ओसरला. देवरूखमध्ये कोंढण येथे भूस्खलन झाले असून, गावातील सुमारे पंधराहून अधिक कुटुंबांतील लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

मुसळधार पाऊस गुरुवारी (ता. २७) रात्रभर सुरूच होता; मात्र शुक्रवारी (ता. २८) सकाळच्या सत्रात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई, हरचिरी, तोणदे, टेंभे, पोमेंडी, सोमेश्‍वर आदी भागात जनजीवन पूर्वपदावर आले.

Rain Update
Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस थांबला पण पाणी पातळीत होतेय वाढ, ७० बंधारे पाण्याखाली

मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खडकवासला, कळमोडी धरणांतून पाण्याचा विसर्ग कमीअधिक करण्यात येत आहे. धरणक्षेत्रात अजूनही जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणांची पाणीपातळी हळूहळू वाढत आहे. सांगली जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २८) सकाळपासून पावसाने उघडीप दिली आहे.

वारणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्याची पातळी स्थिर आहे. जिल्ह्यात दोन दिवस पावसाची संततधार होती. शिराळा तालुक्यात आणि वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू होती. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी भागात पाऊस पावसाचा जोर वाढला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगलीचा पूर्व भागात ढगाळ वातावरण आहे.

Rain Update
Sindhudurg Rain : मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गात रस्ते पाण्याखाली

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात गुरुवारी (ता. २७) सर्वदूर मुसळधार पावसाने संततधार कायम ठेवली. किनवट तालुक्यातील इस्लापूर व परिसरात २६ जुलैच्या मध्यरात्रीपासून पावसाने जोर पकडला. नांदेड जिल्ह्यात बिलोली, भोकर, किनवट अशा सात मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. मुखेड तालुक्यात रात्रीपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.

हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला. बीड जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला असून, अनेक ठिकाणी मध्यम पाऊस पडला. विदर्भातील यवतमाळमधील खातारा (ता. केळापूर) येथे ढगफुटी सदृश पाऊस पडला.

यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्यात ३५४ व्यक्तींचे शेल्टर होममध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. इतर जिल्ह्यांतही पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडल्या असून, खरिपातील पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

१०० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडलेली मंडळे : (स्रोत ः कृषी विभाग)

कोकण विभाग : ठाणे, बलकुम, मुंब्रा १५३, भाईंदर २००, दहिसर, बेलापूर १७६, कल्याण १६०.८, अप्पर १७६.५, ठाकूरही १५१.८, नडगाव १३६.५, सरळगाव, धसई, नयाहडी १२५.५, देहरी १२१.३, भिवंडी १२०, अप्पर भिवंडी १५१.८, अंगाव, डिघशी १३३.३, पडघा १३६.५, खारबाव १५३, खर्डी १२३.३, गोरेगाव १५०.५, कुंभार्ली १७६.५, बदलापूर १५३, अलिबाग, पोयनाड, किहीम, सरल, चरी, चौल, रामरज १०६, ओवले, कर्नाळा, पनवेल १४१.३, पवयंजे १३४, तळोजे १७६.५, मोराबे १२६.८,

Rain Update
Kolhapur Rain : कोल्हापुरात ‘दूधगंगा’त ५८ टक्के; तुळशी धरणात ५४ टक्के साठा

कर्जत १५४.३, नेरळ १२९, कडाव १४१, कळंब १५१.३, कशेळे १४१, चौक, खोपोली १५४.३, उरण १११.३, कोपरोली १०८, जसई ११८.८, पेण १०७.३, हमरापूर, वशी १०८, कसू १०६, करंजवडी, कोंडवी ११७, बोर्ली १०६, खेडशी १०२, मालगुंड १०६, पाली १०८.३, फणसवणे १०२.५, कोंडगाव १४५.३, देवळे १२४.३, तेर्ये १०२.५, पाचल १२७, लांजा १३१.३, भांबेड १२३.५, पुनस १३१.३,

विलवडे १५३.५, वसई, मांडवी, निर्मल, मानिकपूर १५४.५, अगशी १४६.५, विरार १३५.३, वाडा, कोणे १४४, कडूस ११७.३, कांचगड १०२.८, डहाणू १६९.३, मालयण १६९.३, चिंचणी १५२.३, पालघर १०८.८, मनवर १३०.३, बोयसर १५२.३, सफला १०३, अगरवाडी १२२, तारापूर १५२.३, जव्हार १९८, साखर १८८.८, खोडला ११९.३, तलसरी १०१.५, झरी ११९.८.

मध्य महाराष्ट्र : इगतगरी १२३.५, धरणगाव ११९.३, पेठ, कोहर १४८.८, आंबेगाव ११३, आंबा १४५.३,

मराठवाडा : नांदेड शहर १८२.३, तुप्पा १६८, वसरणी १७९.३, विष्णपुरी १६८, लिंबगाव १०२, तरोडा १३९.८, वाजेगाव १७९.३, नळेश्‍वर १५२.३, बिलोली १२२.५, लोहगाव १३०.३, रामतीर्थ १३१.५, इस्लापूर, जलधरा, शिवनी १०१.८,

मुदखेड १३५.३, मुगट १८७.८, बारड १३२.३, धर्माबाद १२१, कारखेली ११९.३, सिरजखोड १२१, उमरी १०८.८, सिंधी ११३.८, अर्धापूर १३२.३, बारबडा १५०.५, कुंतूर १२६.३, नर्सी १३०.३, नायगाव १२६.३, मंजाराम ११०.८, वारंगा ११२, वसमत १६५, हिमायतनगर १६५, गिरगाव ११४.३.

विदर्भ : शिराळा १४५, सातेफळ १३३, बेलोरा १४५, धामणगाव ११३, अंजानसिंगी १०२.८, दत्तापूर १२०, सावळी १११.५, बोरगाव १०६, मारेगाव ११०, मार्दी १००.५, कुंभा ११०, करंजी १३१.८, परसवाडा १००.८, खंबाडा १०१.८, बल्लारपूर १२३.५, गडचिरोली १०८.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com