Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस थांबला पण पाणी पातळीत होतेय वाढ, ७० बंधारे पाण्याखाली

Panchaganga River : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या २४ तासांत झालेल्या पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
Kolhapur Rain
Kolhapur Rainagrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या २४ तासांत झालेल्या पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. दरम्यान आज (ता.२८) सकाळपासून पावसाने थोडी उसंत घेतल्याने दिलासा मिळालाय. दरम्यान घाट माथ्यावर आणि धरण परिसरात होत असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

काल दुपारी ४०.५ असलेली पंचगंगेची पाणी पातळी सकाळी १० पर्यंत ४१.१ इंचावर गेल्याने जवळपास आरद्या फुटाने पाण्याच्या पातळीत वाढ झाली. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट आणि धोका पातळी ४३ फूट आहे. तर काल ८१ बंधारे पाण्याखाली होते ते आज सकाळी कमी होऊन ७० वर आले आहेत.

दरम्यान राधानगरी धरणाचे अद्याप चार स्वयंचलीत दरवाजे उघडे असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील मांडुकलीजवळ पाणी आल्याने कोल्हापूर-गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा बंद झाला. ६० च्यावर मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. २७ मार्गांवरील एस.टी. सेवा बंद करण्यात आलीय.

जिल्ह्यातील कोल्हापूर शहरासह २७ गावांतील सुट्टी दिलेल्या शाळा शुक्रवारपासून सुरू करा. पावसाचा अंदाज घेऊन शुक्रवारपासून स्थलांतरित नागरिकांना स्वगृही पाठवा, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्याचेही आदेश त्यांनी दिले.

Kolhapur Rain
Kolhapur Flood : कोल्हापुरकरांना महापुराची धास्ती, वाहने लावली थेट रस्त्यांवर

राधानगरीसह कासारी, कुंभी, कोदे धरणांतून विसर्ग सुरू असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ सुरू झाली. पंचगंगेचे पाणी शुक्रवार पेठेतील जामदार क्लबजवळ आले आहे. शहरातील काही भागांत नागरी वस्तीलगत पाणी आले आहे.

यासह आंबेवाडी-चिखली, चिखली-वरणगे, कोल्हापूर-पन्हाळा या मार्गांवर रस्त्यालगत पाणी आले. पुणे-बंगळूर महामार्गावरील सेवा रस्त्यावर पुराचे पाणी आले. यामुळे या रस्त्यावरून सांगली फाट्याकडे जाणारी वाहतूक मुख्य महामार्गावरून सुरू होती.

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा धरण एकूण क्षमता आजचा साठा (टीएमसीमध्ये)

राधानगरी ८.३६, ८.३०, तुळशी ३.४७, १.९१, वारणा ३४.३९, २८.९३, दूधगंगा २५.३९, १४.९२, कासारी २.७७, २.२८, कडवी २.५१, २.४१, कुंभी २.७१, २.२५, पाटगाव ३.७१, २.७८, चिकोत्रा १.५२, ०.९०, चित्री १.८८, १.४३, जंगमहट्टी १.२२, १.०२ घटप्रभा १.५६, १.५६, जांबरे ०.८१, ०.८२, आंबेओहोळ १.२४ १.०१ असा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com