Kisan exhibition: वरद क्रॉप सायन्सच्या दालनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद

वरत क्रॉप सायन्स ही कंपनी गेल्या तीस वर्षांपासून कार्यरत आहे. कंपनीच्या स्टॉलला एका दिवसात तब्बल ५ हजार शेतकऱ्यांनी भेट देऊन उत्पादनांची व सेवांची माहिती घेतली. प्रदर्शनातील ॲग्री इनपुट हॉल मध्ये वरद क्रॉप सायन्सचा स्टॉल क्रमांक २४८ आहे.
Kisan Exhibition
Kisan ExhibitionAgrowon
Published on
Updated on

पुणे येथे १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या किसान कृषी प्रदर्शनात (Kisan Agri Exhibition) अनेक खासगी कंपन्या, कृषी संशोधन संस्था, कृषी विद्यापीठांनी सहभाग घेतला आहे. या प्रदर्शनात अत्याधुनिक तंत्रज्ञान (Modern Technology), पाणी नियोजन (Water Planning), यंत्रसामुग्री, रोपवाटिका (Nursery), कृषी लघुउद्योग, जनावरांच्या जाती (Animal Breed) आदी विषयांची नवनवीन माहिती मिळते. या प्रदर्शनात जालना येथील वरद क्रॉप सायन्स (Varad Crop Science) या कंपनीचा स्टॉल शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Kisan Exhibition
Crop Protection : पीकसंरक्षणाचे नैसर्गिक उपाय

वरत क्रॉप सायन्स ही कंपनी गेल्या तीस वर्षांपासून कार्यरत आहे. कंपनीच्या स्टॉलला एका दिवसात तब्बल ५ हजार शेतकऱ्यांनी भेट देऊन उत्पादनांची व सेवांची माहिती घेतली. प्रदर्शनातील ॲग्री इनपुट हॉल मध्ये वरद क्रॉप सायन्सचा स्टॉल क्रमांक २४८ आहे. कंपनीने वरद तंत्र या नावाने पीक व्यवस्थापन तंत्र विकसित केले असून सर्व पिकांसाठी कंपनीची उत्पादने परिणामकारक ठरलेली आहेत, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

Kisan Exhibition
Crop Protection : वाढत्या थंडीमध्ये फळबागांचे संरक्षण

विशेष म्हणजे कंपनीने शेतकऱ्यांसाठी वरद शेतकरी मित्र या नावाने मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना ४० हून अधिक पिकांची सविस्तर माहिती मिळते. लागवडीपासून काढणीपर्यंत पीकवाढीच्या प्रत्येक टप्प्यावरची तपशीलवार माहिती सोप्या भाषेत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच शेतकऱ्यांना हवामानातील बदल, कीड, रोग व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन या ॲपच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना आता अचूक आणि शास्त्रीय माहितीसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.या कंपनीच्या स्टॉलचे उद्घाटन जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

हे शेतकरी तीन वर्षांपासून वरद तंत्राचा वापर आपल्या शेतीत करत आहेत. वरद क्रॉप सायन्स आणि वरद तंत्राच्या माध्यमातून राज्यातीलच नव्हे तर देशातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असे कंपनीच्या कृषितज्ज्ञांनी सांगितले. कमी खर्चात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा कंपनीचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com