Chana Sowing : हरभऱ्याचा पेरा २ लाख ६ हजार हेक्टरवर

परभणी जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत ज्वारी, गहू, मका या तृणधान्यांची १ लाख ५४ हजार ८७६ पैकी ७२ हजार ९८४ हेक्टरवर (४७.१२ टक्के) पेरणी झाली आहे.
Chana Sowing : हरभऱ्याचा पेरा २ लाख ६ हजार हेक्टरवर

परभणी ः या वर्षीच्या रब्बी हंगामात (Rabi Season) शुक्रवार (ता. २५)पर्यंत परभणी जिल्ह्यात २ लाख ७० हजार ७९४ पैकी १ लाख ७४ हजार ४३१ हेक्टर (६४.४१ टक्के) आणि हिंगोली जिल्ह्यात १ लाख ७६ हजार ८९१ पैकी १ लाख ३५ हजार २०८ हेक्टरवर (७६.४४ टक्के) अशी या दोन जिल्ह्यांत मिळून एकूण ३ लाख ९ हजार ६३९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. आजवरच्या पेरणीमध्ये (Rabi Sowing) हरभऱ्याचे क्षेत्र (Chana Sowing Acreage) २ लाख ६ हजार २३६ हेक्टर आहे.

Chana Sowing : हरभऱ्याचा पेरा २ लाख ६ हजार हेक्टरवर
Chana Market : उत्तर भारतात लवकर गहू पेरणीचा फायदा होणार की तोटा?

परभणी जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत ज्वारी, गहू, मका या तृणधान्यांची १ लाख ५४ हजार ८७६ पैकी ७२ हजार ९८४ हेक्टरवर (४७.१२ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीची १ लाख १३ हजार ९० पैकी ५६ हजार ४८५ (४९.५८ टक्के), गव्हाची ३९ हजार ३०८ पैकी १५ हजार ४०६ हेक्टर (३०.१९ टक्के) पेरणी झाली आहे. कडधान्यांची १ लाख १२ हजार २७२ पैकी १ लाख ५७६ हेक्टरवर (८९.५८ टक्के) पेरणी झाली. त्यात हरभऱ्याची १ लाख १२ हजार १७० पैकी १ लाख ५६२ हेक्टर (८९.६५ टक्के) पेरणी आहे. करडई, जवस, तीळ, गळीत धान्यांची ३ हजार ६४४ पैकी ८७० हेक्टरवर (२३.८९ टक्के) पेरणी झाली. त्यात करडईची ३ हजार पैकी ८२२ हेक्टर (२४.३८ टक्के) पेरणी झाली आहे.

Chana Sowing : हरभऱ्याचा पेरा २ लाख ६ हजार हेक्टरवर
Chana Rate : हरभरा : मंदी की संधी?

हिंगोली जिल्ह्यात तृणधान्यांची ५५ हजार ६७९ पैकी २९ हजार १५८ हेक्टर ५२.३७ टक्के) त्यात ज्वारीची ११ हजार ६९७ पैकी ६ हजार ४०२ हेक्टर (५४.७३ टक्के), गव्हाची ४२ हजार ५०५ पैकी २२ हजार १६७ हेक्टर (५२.१५ टक्के) पेरणी झाली आहे. कडधान्यांची १ लाख २० हजार ३६९ पैकी १ लाख ५ हजार ७६३ हेक्टरवर (८७.८७ टक्के) पेरणी झाली. त्यात हरभऱ्याची १ लाख २० हजार १४७ पैकी १ लाख ५ हजार ६७४ हेक्टर (९७.८५ टक्के) पेरणी झाली. गळीत धान्यांची ८४२ पैकी २८७ हेक्टर (३४.०५ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात करडईची २०५ पैकी २८४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. औंढा नागनाथ तालुक्यात सरासरी क्षेत्रापेक्षा जास्त पेरणी झाली आहे.

तालुकानिहाय रब्बी पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

परभणी ५७९०० ४१८०४ ७२.२

जिंतूर ५३७३० ४३४०५ ८०.७८

सेलू ३३५६१ २६४८६ २७.७४

मानवत २६११९ ७७८३ ४८.२८

पाथरी १७०७२ ४५०८ २६.४०

सोनपेठ १५६९८ ८६५३ ५५.१२

गंगाखेड ३२०८६ २३१९८ ७२.३०

पालम २०१३० ११७९७ ५८.६०

पूर्णा २४४९५ ६७९६ २७.७४

हिंगोली ३१०७४ २९००१ ९३.३३

कळमनुरी ५०१४६ ३४५०१ ६८.८०

वसमत ४२०१९ २०३०४ ४८.३२

औंढा नागनाथ ३५७२६ २९७८५ ११५.७८

सेनगाव २७९२४ २१६१७ ७७.४१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com