संत्रा फळगळ बेदखल

बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे संत्रापट्ट्यात फळगळ होत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. भरपाईसाठी सर्व्हेक्षण व पंचनाम्याची मागणीदेखील शेतकऱ्यांनी केली.
संत्रा फळगळ बेदखल
संत्रा फळगळ बेदखल

अमरावती ः बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे संत्रापट्ट्यात फळगळ होत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. भरपाईसाठी सर्व्हेक्षण व पंचनाम्याची मागणीदेखील शेतकऱ्यांनी केली. मात्र गेल्या अनेक वर्षांत फळगळीपोटी भरपाईच दिली गेली नसल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. 

संत्रा हे विदर्भाचे मुख्य फळपीक मात्र तंत्रज्ञानाचा अभाव, एकाच वाणावरील अवलंबिता या कारणामुळे उत्पादकतेच्या बाबतीत नागपुरी संत्रा देशातील इतर संत्रा वाणाच्या तुलनेत पिछाडला आहे. त्यासोबतच कीड-रोगांचा प्रादुर्भाव बागांमध्ये वाढीस लागल्याने अनेक शेतकऱ्यांना बागा काढून टाकण्याची वेळ आली. संत्रा बागेत फूल आणि फळधारणा व्हावी याकरिता हंगामात बाग ताणावर सोडली जाते. गेल्या काही वर्षांत मात्र वातावरणातील बदलामुळे बाग ताणावर असतानाच पावसाची संततधार राहते. याच कारणांमुळे बागेत बुरशीजन्यरोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. 

या समस्येचे निराकरण संशोधक संस्थांकडून अपेक्षितरीत्या झाले नाही. परिणामी, दरवर्षी संत्रापट्ट्यातील शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागते. या वर्षी देखील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने आंबिया बहरातील फळांची गळ झाली. या वर्षी देखील कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर सर्व्हेक्षण, पंचनामे व भरपाईची मागणी झाली. परंतु शासनाकडून ही मागणीच बेदखल केली जात असल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिली.

राज्यातील इतर फळपिकांचे नुकसान झाल्यास त्यापोटी भरपाई दिली जाते, असा सर्वदूर अनुभव आहे. संत्रा पीक मात्र याला अपवाद ठरले आहे. नैसर्गिक संकटाच्या काळात आजवर एकदाही संत्रा उत्पादकांना शासनाकडून मदत करण्यात आली नाही. मदत तर दूरच फळगळ नियंत्रणासाठी संशोधक संस्थांकडून शिफारशीदेखील करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे संत्रा उत्पादकांसाठी ही स्थिती अडकित्त्यात सापडल्यागत आहे. - श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com