कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी कोंडले

‘स्कायमेट’च्या सदोष वेदर स्टेशनमुळे अतिवृष्टीपासून डावल्याचा आरोप
Agriculture
AgricultureAgrowon

चांदूर बाजार, जि. अमरावती : सात पैकी पाच मंडळांत अतिवृष्टी (Heavy Rain) दाखवत दोन मंडळांना मात्र नुकसान भरपाईपासून (Crop Damage Compensation) वंचित ठेवण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयातच कोंडले. (Agriculture Officials Locked Up) रात्री एक वाजता कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांची सुटका केली.

Agriculture
Cotton Meet : जळगावात उद्यापासून कापसावर मंथन

चांदूरबाजार तालुक्यातील सातपैकी तळेगाव मोहना व आसेगाव ही दोन मंडळ अतिवृष्टी व नुकसानभरपाईपासून वगळण्यात आली. सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असताना त्याच तालुक्यातील दोन मंडळांमध्ये ती का नोंदवली गेली नाही, असा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. स्कायमेटचे सदोष वेदर स्टेशन याला कारणीभूत असल्याचा आरोप ही शेतकरी करीत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून शेतकऱ्यांनी लढा पुकारला आहे.

Agriculture
Soybean Oil Import : सोयाबीन तेल आयात आठ टक्क्यांनी वाढली

तहसीलदार, चांदूरबाजार तालुका कृषी अधिकारी दांडेगावकर यांना या संदर्भाने वारंवार निवेदने देण्यात आली. दोन्ही गावांतील शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मात्र या निवेदनाची दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. त्यासोबतच स्कायमेटकडून सदोष यंत्रणा बदलली जात नाही तोवर कृषी कार्यालयाचे गेट उघडणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला.

या आंदोलनाची दखल घेत वरिष्ठ अधिकारी देखील चांदूरबाजार येथे दाखल झाले. शेतकऱ्यांसोबत दिवसभर चर्चा करण्यात आली. परंतु या चर्चेतून काहीच निष्पन्न न झाल्याने रात्री एक वाजेपर्यंत हा तिढा कायम होता. अखेरीस तालुका कृषी अधिकारी दांडेगावकर यांनी स्कायमेटचे वेदर स्टेशन असलेल्या तळेगाव मोहना व आसेगाव येथील परिसराचा पंचनामा करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेत असल्याची जाहीर करीत कृषी अधिकाऱ्यांची सुटका केली.

दुसऱ्या दिवशी पहाटे स्कायमेटचे वेदर स्टेशन असलेल्या तळेगाव मोहना या गावात अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. या वेळी वेदर स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर गवत वाढल्याचे निदर्शनास आले. त्यासोबतच पर्जन्यमापक यंत्राची स्थिती योग्य नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. या सगळ्या बाबींचा अंतर्भाव पंचनाम्यात करून तसा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाणार आहे.

चांदूरबाजार तालुक्यातील पाच मंडळांमध्ये तीन वेळा अतिवृष्टी झाली. दोन मंडळांमध्ये मात्र ६५ मिलिमीटरपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्याने ही दोन मंडळ अतिवृष्टीपासून वगळण्यात आली. मात्र संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांना मिळणार आहे. दरम्यान, स्कायमेटची अनागोंदी याला कारणीभूत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप असल्याने पंचनामा करून तसा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे. हे दोन्ही मंडळ अतिवृष्टिग्रस्त समजण्यात जावी, अशी मागणी देखील केली आहे.

- राहुल सातपुते,

उपविभागीय कृषी अधिकारी, मोर्शी

स्कायमेटचे वेदर स्टेशन सदोष असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. त्यानुसार कंपनीच्या प्रतिनिधींसोबत पाहणी केली. त्या वेळी वेदर स्टेशन परिसरात गवत वाढल्याचे आढळून आले.

- एस. पी. दांडेगावकर,

तालुका कृषी अधिकारी, चांदूरबाजार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com