Cotton Meet : जळगावात उद्यापासून कापसावर मंथन

खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनतर्फे येत्या शनिवारी (ता. १७) व रविवारी (ता. १८) जळगाव शहरानजीकच्या जळगाव-पाचोरा रस्त्यावरील जैन हिल्सवर ऑल इंडिया कॉटन ट्रेड ‘मीट’ (अखिल भारतीय कापूस व्यापार बैठक) होणार आहे.
cotton rate
cotton rate agrowon

जळगाव ः खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनतर्फे(Cotton Jinning Pressing Association) येत्या शनिवारी (ता. १७) व रविवारी (ता. १८) जळगाव शहरानजीकच्या जळगाव-पाचोरा रस्त्यावरील जैन हिल्सवर ऑल इंडिया कॉटन ट्रेड ‘मीट’ (Cotton Trade Meet) (अखिल भारतीय कापूस व्यापार बैठक) होणार आहे. भारतातील कापूस क्षेत्रातील ६०० प्रतिनिधी बैठकीत सहभागी होतील, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी दिली.

cotton rate
Cotton Rate : कापूस दर आवाक्यात, तरीही उद्योगांकडून उठाव का नाही?

जिनिंग प्रेसिंग कारखान्यांना भेट, कापूस पीक पाहणी कार्यक्रम शनिवारी होईल. जैन हिल्सवर मुख्य कार्यक्रम किंवा बैठक रविवारी (ता. १८) सकाळी १० वाजता सुरू होईल. जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, एलडीसी या आंतरराष्ट्रीय कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक लुईस ड्रेफ्यूज, केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी, राज्याच्या वस्त्रोद्योग आयुक्त शीतल उगले, भारतीय कापूस महामंडळाचे (सीसीआय) कार्यकारी संचालक प्रदीप अग्रवाल, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा, नॉर्थ इंडिया कॉटन असोसिएशनचे माजी अध्यक्ष महेश शारदा, महाराष्ट्र जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनचे अध्यक्ष भूपेंद्रसिंह राजपाल, मध्य प्रदेश कॉटन असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जैन, अजय दलाल (गुजरात), अरुण अग्रवाल आदी उपस्थित राहतील.

cotton rate
Cotton Rate : पावसामुळं कापूस उशीरा येणार?

कापसाच्या जिनिंगचा दर्जा हा नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचा कसा करता येईल, याबाबत बजाज स्टीलचे ललित कलंत्री (नागपूर) मार्गदर्शन करतील. सूत खरेदीदार धीरज खेतान (सालासार बालाजी स्पिनिंग), आशिष झांब (नाहर स्पनिंग), संचित राजपाल (मनजित कॉटन), धमेंद्र गोयल (श्रीधर कॉटस्पीन), रिपलभाई (राजकोट), सुनील अग्रवाल (चोपडा) चर्चेत सहभागी होतील.

...यांचा होणार सत्कार

भारतात सर्वप्रथम जिनिंग उद्योग खानदेशातील धरणगाव (जि. जळगाव) येथे सुरू झाला होता. खानदेशात पाचोरा (जि. जळगाव) येथे चुनिलाल मोतीराम जिनिंग प्रेसिंग कारखाना १०० वर्षे जुना असून, त्यांची पाचवी पिढी या उद्योगात कार्यरत आहे, या कारखान्याचे संचालक हेमंत संघवी यांचा व चोपडा (जि. जळगाव) येथील मे. गोवर्धनदास भिकारीदास जिनिंग प्रेसिंग कारखाना ९० वर्षांपासून कार्यरत आहे. या कारखान्याचे संचालक तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांचा सत्कार या बैठकीत होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com