जळगाव : जिल्हा दूध संघातील अखाद्य (बी ग्रेड) तुपाची विक्री (Ghee Sale) करून सात लाख ९२ हजारांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी चौकशी करावी, अशी तक्रार संघाचे कार्यकारी संचालक व प्रभारी कार्यकारी संचालकांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
तक्रारीनुसार २९ ऑगस्टला विषय क्रमांक १७ अन्वये अखाद्य (बी ग्रेड) तूप सुमारे ९१५ किलो (अंदाजे रक्कम रुपये सात लाख ९२ हजार) माल विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. त्या आनुषंगिक टिपणी विक्री विभागाचे प्रमुख अनंत अंबीकार यांनी सादर केली होती. या बाबत खरेदीदांराकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र संघाकडे साठा उपलब्ध नाही व निखिल सुरेश नेहते व अन्य काही जणांनी विनामंजुरीने अधिकृतपणे मे. विठ्ठल-रुक्मिणी एजन्सी, जळगाव यांना एकूण एक हजार ८०० किलो माल १ ऑगस्ट २२ या कालावधीत विक्री करून एक लाख ५३ हजारांचा अपहार केला.
प्रशासकीय समितीने त्यावर म्हटले आहे, की मागील प्रशासकीय सभा क्रमांक २ ही १३ ऑगस्ट २०२२ मध्ये अखाद्य (बी ग्रेड) तूप विक्री करू नये, असे निर्देश दिलेले असताना तूप विक्री करून संघास नुकसान पोहोचविण्याचा हेतू होता की काय? तसेच अंबीकार यांनी २३ ऑगस्ट २०२२ ला त्यांच्याकडे बी ग्रेड तुपाचा साठा नसतानासुद्धा प्रशासकीय समितीला ९१५ किलो तूप विक्री करण्यासाठी टिपणी दिली. तथापि, प्रशासकीय समितीच्या सदस्यांनी वेळोवेळी बी ग्रेड तुपाच्या नमुन्याची मागणी केली असता ते उपलब्ध करून दिलेले नाही.
यावरून ‘ए’ ग्रेड तुपाची किंमत ५२५ रुपये प्रतिकिलो असते. मात्र बी ग्रेड तूप ८५ रुपये प्रतिकिलोने विक्री केले. त्याद्वारे संस्थेचे सात लाख ९२ हजार आर्थिक नुकसान करून गैरव्यवहार केला आहे. या प्रकरणी तक्रारीची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार आहे. प्रभारी कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे, कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्या स्वाक्षरीने हे लेखी पत्र देण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.