जळगाव जिल्ह्यात २४ अमृत सरोवरांची निर्मिती पूर्ण

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ उपक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये ७५ अमृत सरोवरांची निर्मिती करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.
Amrit Sarovar
Amrit SarovarAgrowon
Published on
Updated on

जळगाव ः ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ उपक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये ७५ अमृत सरोवरांची निर्मिती (Amrit Sarovar) करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले होते. त्यानुसार जिल्ह्यात १०० अमृत सरोवर तयार करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी २४ ठिकाणी अमृत सरोवरांची निर्मिती पूर्ण झाली आहे. त्यातील १३ ठिकाणी स्थानिकांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

Amrit Sarovar
Drip Irrigation: ठिबक सिंचन अनुदानात केला लाखोंचा घोटाळा

जिल्ह्यात पावसाच्या पाण्याचे संधारण करण्यासाठी ही योजना आहे. २९ मार्च २०२२ रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते जलशक्‍ती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. योजनेचा कालावधी २९ मार्च २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ असा आहे. जलसंधारण पावसाचे पुनर्भरण, जलस्रोतांचे नूतनीकरण, जलस्रोतांचा माहिती संकलन करणे, जलसंधारण संबंधित सर्व कामे करणाऱ्या जलसंधारण विभाग, वनविभाग, जलसंपदा विभाग, कृषी विभाग, मनरेगा विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून ही कामे होणार आहेत. ‘मनरेगा’अंतर्गत लोकसहभागांमार्फत एकूण ११६१ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

Amrit Sarovar
Irrigation : खानदेशात अनेक सिंचन प्रकल्पांत ठणठणाट

त्यात गाळ काढणे, नाला खोलीकरण, शोषखड्डे, सिमेंट बंधारा, विहीर पुनर्भरण यांचा सामावेश आहे. ५४६ कामे पूर्ण झाली आहेत. यात किमान एक एकर आकारमान असलेले तलाव तयार करण्यात येत आहेत. किमान दहा हजार क्युबिक मीटर क्षमता पाणी साठवण क्षमता असलेल्या ठिकाणीच कामे हाती घेण्यात आली आहेत. जळगाव जिल्ह्यात १०० अमृत सरोवर मार्क करण्यात आलेले आहे. २४ ठिकाणची कामे पूर्ण करण्यात आलेली आहे.

...या ठिकाणी झाले ध्वजवंदन

आडगाव तलाव (ता. चाळीसगाव), ब्राह्मण शेवगे गाव तलाव (ता. चाळीसगाव), पाझर तलाव खर्ची खुर्द (ता. एरंडोल), पाझर तलाव कंडारी (ता. जळगाव), तालखेडे (ता. मुक्ताईनगर) येथील तलाव), पाझर तलाव गलवाडी (ता. रावेर), पाझर तलाव वाकी (ता. बोदवड), गावतलाव वराड बुद्रूक (ता. बोदवड), गाव तलाव कुऱ्हाड बुद्रूक (ता. पाचोरा), तारखेडा -१ येथील तलाव (ता. पाचोरा), तारखेडा - २ येथील तलाव (ता. पाचोरा) आदी ठिकाणी ध्वजवंदन करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com