Kharif Season : तूर, उडीद डाळींचे भाव वाढणार, माॅन्सूनने बिघडवले सारे गणित

Pulses Sowing : देशात मान्सूनच्या पावसाअभावी चालू खरीप हंगामात आतापर्यंत कडधान्य पिकांच्या पेरणीचे क्षेत्र ८.५८% ने घटून सुमारे १२० लाख हेक्टरवर आले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता असल्याने तूर, मूग आणि उडीद डाळींचे भाव वाढणार आहेत.
Farmer
FarmerAgrowon
Published on
Updated on

Kharif Sowing : यंदा मान्सूनच्या पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या उशिरा झाला. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीवरून चालू खरीप हंगामात कडधान्य पिकांच्या पेरणीचे क्षेत्र आतापर्यंत ८.५८% ने घटून ११९.९१ लाख हेक्टरवर आले आहे. त्यात देशात काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिके वाया गेली आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता असल्याने तूर, मूग आणि उडीद डाळींचे भाव वाढणार आहेत.

Farmer
Kolhapur Kharif Season : खरीप पिकांना धोका! धरणांच्या पाण्याच्या नियोजनाबाबत पालकमंत्र्यांनी केल्या सूचना

खरीप पिकांची पेरणी जून ते सप्टेंबर या कालावधीत नैऋत्य उन्हाळी मान्सून सुरू झाल्यावर केली जाते. कडधान्य, तेलबिया, कापूस आणि ऊस याशिवाय भात हे खरीपाचे मुख्य पीक आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, चालू खरीप हंगामात ८ सप्टेंबरपर्यंत भात पेरणीखालील एकूण क्षेत्र ४०३.४१ लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे, तर वर्षापूर्वीच्या काळात ते ३९२.८१ लाख हेक्टर होते.

मध्य प्रदेशात सर्वात जास्त कडधान्यांचे क्षेत्र घटले, त्यानंतर कर्नाटक आणि त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. मध्य प्रदेशातील चालू खरीप हंगामात सप्टेंबरपर्यंत कडधान्य पिकाखालील क्षेत्र १९.७२ लाख हेक्टर होते, तर वर्षभरापूर्वी याच काळात २३.४४ लाख हेक्टर होते.

Farmer
Kharif Season : खरीप गेलाच, आता रब्बीचाही वाटेना भरोसा

कर्नाटकातही कडधान्याखालील क्षेत्र १६.७० लाख हेक्टर होते. गेल्या वर्षी याच कालावधीत ते २०.०७ लाख हेक्टर होते. महाराष्ट्रात वार्षिक आधारावर १८.८९ लाख हेक्टरवरून १६.१५ लाख हेक्टरवर घट झाली. चालू खरीप हंगामात आतापर्यंत राजस्थानमध्ये कडधान्य पिकाखालील क्षेत्र ३५.३० लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे, मागील वर्षी ते ३३.९९ लाख हेक्टर होते. यामुळे इतर प्रमुख उत्पादक राज्यांमधील कमतरता काही प्रमाणात भरून निघू शकते.

आकडेवारीनुसार, चालू खरीप हंगामात ८ सप्टेंबरपर्यंत तूरीचे क्षेत्र घटून ४२.९२ लाख हेक्‍टरवर आले, ते मागील वर्षी याच काळात ४५.६१ लाख हेक्‍टर होते. उडदाचे क्षेत्रही ३१.८९ लाख हेक्टरवर घसरले, जे एका वर्षापूर्वी याच काळात ३७.०८ लाख हेक्टर होते. कुल्ठीचे क्षेत्र ३१ हजार हेक्टर होते, तर इतर कडधान्यांचे क्षेत्र १३.६८ लाख हेक्टर होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com