Mosambi Production : सततच्या अतिवृष्टीमुळे मोसंबी उत्पादनात घट

हवामान बदलामुळे मागील दोन-तीन वर्षांपासून मोसंबी पट्यात होणाऱ्या सततच्या अतिवृष्टीमुळे मोसंबीसह अन्य फळपिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहेत.
Mosambi Production  : सततच्या अतिवृष्टीमुळे मोसंबी उत्पादनात घट

अंबड, जि. जालना : हवामान बदलामुळे (Climate Change) मागील दोन-तीन वर्षांपासून मोसंबी पट्यात (Mosambi Belt) होणाऱ्या सततच्या अतिवृष्टीमुळे मोसंबीसह अन्य फळपिकांच्या उत्पादनावर (Mosambi Production) विपरीत परिणाम होत आहेत. उत्पादनात घट येत, असल्याचे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख कृषी शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.

Mosambi Production  : सततच्या अतिवृष्टीमुळे मोसंबी उत्पादनात घट
Mosambi : आधी गुंडीगळ, आता फळगळ

मोसंबी संशोधन केंद्र, कृषी विभाग आणि इफ्को यांच्या संयुक्त विद्यमाने जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहापूर येथे मोसंबी व ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (ता. २२) करण्यात आले होते. या मोसंबी-ऊस परिसंवादात डॉ. पाटील बोलत होते.

Mosambi Production  : सततच्या अतिवृष्टीमुळे मोसंबी उत्पादनात घट
Mosambi Management : मोसंबी झाडांची रोगप्रतिकारकता वाढवा

या वेळी व्यासपीठावर उपविभागीय कृषी अधिकारी राम रोडगे, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, ऊसविकास अधिकारी रामराव वलटे, ‘इफ्को’चे व्यवस्थापक सुनील कुलकर्णी, उपव्यवस्थापक अशोक साकळे, ‘आत्मा’चे तंत्रज्ञान समन्वयक डॉ ओमप्रकाश कोहिरे, मंडळ कृषी अधिकारी कल्याणराव शिंदे आदींची उपस्थिती होती.

डॉ. पाटील म्हणाले, की मोसंबी हे फळ पीक जालना जिल्ह्याचे वैभव आहे. मोसंबीच्या विशिष्ट चव, रंग व स्वादामुळे भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. मोसंबी उत्पादन वाढवायचे असेल, तर व्यवस्थापन हे शास्त्रीयदृष्ट्या करणे आवश्यक आहे.

मोसंबीमध्ये साधारणपणे मृग बहर, हस्त बहर व आंबिया बहर असे तीन प्रकारचे बहर घेतले जातात, शास्त्रीयदृष्ट्या फक्त एकच बहर घ्यावा. वलटे म्हणाले, की उसाच्या पिकात सततच्या रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनी क्षारपड होऊन उसाची देखील उत्पादकता कमी होत आहे. कृषी सहायक गोवर्धन उंडे यांनी रब्बी हंगामातील हरभरा लागवड तंत्रज्ञान या विषयावर सविस्तर माहिती दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com