
गेवराई, जि. बीड: मराठवाड्यातील मोसंबी (Mosambi Orchard) बागांना मंद ऱ्हास या जीवणूजन्य रोगापासून वाचविण्यासाठी झाडांची रोगप्रतिकार क्षमता वाढविण्याची गरज, असल्याचे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे (Citrus Crop Research Center) प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.
ताकडगाव (ता. गेवराई) येथे मोसंबी संशोधन केंद्रातर्फे शनिवारी (ता. १२) आयोजित प्रक्षेत्र भेटीदरम्यान ते बोलत होते. या वेळी मोसंबी बागायतदार कृष्णा पुंड, दिनकर पुंड, सुभाष सुतार, तहसीलदार रामराव ठोंबरे, चंद्रकांत राठोड (उमापुर) वस्तु व सेवा कर अधिकारी राजेंद्र राठोड, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. दीपक कचवे आदी उपस्थित होते.
या वेळी डॉ. पाटील म्हणाले, की मोसंबी बागांचे आरोग्य वाढीसाठी रासायनिक, जैविक अन सेंद्रिय खतासोबतच सूक्ष्म मूलद्रव्याची मात्रा वेळोवेळी झाडांच्या वयानुरूप देणे फायदेशीर ठरते. बहराचे नियोजन करताना जमिनीच्या अन पाण्याच्या उपलब्धतेनुसार एकाच बहराचे नियोजन केल्यास झाडे रोग अन किडींना सक्षमपणे तोंड देऊ शकतात. नवीन लागवड करताना आपल्याच बागेतील उत्कृष्ट झाड निवडून त्याची कलमे करणे मंद ऱ्हास रोगास नियंत्रित ठेवणेसाठी फायदेशीर ठरू शकते. या वेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या शंकांची सोडवणूक करण्यात आली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.