Biporjoy Cyclone
Biporjoy Cyclone Agrowon

Biporjoy Cyclone : गुजरातमध्ये बिपरजॉयची अद्यापही दाहकता, हातातोंडाशी आलेलं पीक पाण्याखाली

Crop Damage Gujarat : अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातच्या समुद्र किनारपट्टीवर मागचे दोन दिवस थैमान घातल्यानंतर काही अंशी हे वादळ शमले आहे.

Biporjoy Cyclone Effect : अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातच्या समुद्र किनारपट्टीवर मागचे दोन दिवस थैमान घातल्यानंतर काही अंशी हे वादळ शमले आहे. दरम्यान हे वादळ तुर्तास थांबलं असले तरी पुढच्या १२ तासांत वादळ पुन्हा तीव्र होण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली.

हवामानविभागाच्या माहितीनुसार आग्नेय पाकिस्तानवरील चक्रीवादळ मागच्या २४ तासांत रात्री ११.३० वाजता 'डीप डिप्रेशन' मध्ये कमकुवत झाले. दरम्यान या वादळाने गुजरातमधील हजारो हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले आहे.

गुजरातमध्ये शेकडो घर कोसळली

दरम्यान गुजरात प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्यात आला यावेळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील तीन राज्यमार्गावर शेकडो झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक बंद आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार एकूण ६०० झाडे उन्मळून पडली आहेत. तर ११ पक्की घरे आणि ४७७ कच्ची घरे कोसळली आहेत. याचबरोबर अनेक किरकोळ घरांचे नुकसान झाले आहेत.

Biporjoy Cyclone
Cyclone Biporjoy Update : बिपॉरजॉय चक्रीवादळाचा गुजरातमध्ये हाहाकार, पिकांसह, जनावरे गेली वाहून

वादळामध्ये सर्वात मोठे नुकसान वीज कंपन्यांचे झाले आहे. विद्यूत खांब पडल्याने अनेक भागातील अद्यापही वीजपुरवठा खंडीत झाला आहे. गुजरातचे मदत आयुक्त आलोक कुमार पांडे यांच्या माहितीनुसार, किमान ४ हजार ६०० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता, तो आता सुरळीत करत ३ हजार ५८० गावांत वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. सरकारने जारी केलेल्या पसिद्धीपत्रकानुसार, १ हजार हून अधिक टीम वीज पुरवठा पूर्ववत करण्यात व्यस्त आहेत.

Biporjoy Cyclone
Biporjoy Cyclone Gujrat Update : कच्छ-सौराष्ट्रला ‘बिपरजॉय’चा तडाखा

हजारो गावांचा विद्युत पुरवठा खंडीत

गुजरातमध्ये तांडव केल्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळ अखेर राजस्थानकडे सरकले आहे. दरम्यान गुजरातमध्ये अद्यापही हजारो एकर शेती पाण्याखाली आहे. तर अनेक जनावरे वाहून गेल्याची माहिती आहे. याबाबत अद्यापही शासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

बिपरजॉयने गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात हाहाकार उडवला. येथे सुमारे ३०० विद्युत खांबांचे नुकसान झाले आहे. यामुळे सुमारे ४५ गावांतील वीज पुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी मोबाईल टॉवर, वीज आणि ट्रान्समिशनचे खांब कोसळले आहे. कच्छमधील घरांची पडझड झाली आहे. चक्रीवादळाशी संबंधित घटनांमध्ये गुजरातमध्ये २३ जण जखमी झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com