Corruption : बदल्यांच्या प्रक्रियेत आर्थिक वसुली

कृषी सहायक संघटनेचे नरेंद्र पकडे यांचा आरोप
Corruption
CorruptionAgrowon

अमरावती ः प्रभारी कृषी सहसंचालक असताना संवर्ग तीन मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नती आणि आंतरसंभागीय बदल्यांच्या प्रक्रियेत (Administration process)आर्थिक वसुली झाली आहे. वाशीमचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार (Shankar Totwar) आणि तत्कालीन प्रशासन अधिकारी गजानन पाटील (Gajanan Patil) यांनी ही वसुली केली आहे,

Corruption
Crop Damage : नुकसानग्रस्तांना पीकविम्याचा लाभ द्या,

असा खळबळजनक आरोप महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे तत्कालीन अमरावती जिल्हाध्यक्ष नरेंद्र पकडे यांनी केला आहे. मात्र हा आरोप फेटाळताना शंकर तोटावार यांनी या प्रकरणी संबंधितांनी त्याच वेळी लाचलुचपत खात्याकडे तक्रार का केली नाही, असा सवाल केला आहे.

Corruption
Crop Damage : अतिवृष्टिने पिकांचे मोठे नुकसान तरीही नजर अंदाज पैसेवारी ५८ पैसे

यासंदर्भात सक्‍तवसुली संचालनालयाला (ईडी) लिहिलेल्या पत्रातून संबंधित अधिकाऱ्यांवर थेट कारवाईची मागणी श्री. पकडे यांनी केली आहे. या पत्रानुसार, अमरावती विभागाचे तत्कालीन सहसंचालक सुभाष नागरे यांची संचालक पदी पदोन्नती झाली. त्याच वेळी अमरावती विभागीय कृषी सहसंचालक पदाचा कार्यभार स्वीकारण्यास कोणीच तयार नसल्याने ही जबाबदारी तोटावार यांच्याकडे देण्यात आली.

Corruption
Crop Damage : अतिवृष्टिग्रस्त निधी वितरण प्रक्रियेत सरपंच संघटना देणार योगदान

त्यांनी या संधीत संवर्ग-तीन मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या, आंतरसंभागीय बदल्या, पदोन्नती या विषयात मोठी आर्थिक वसुली केली, असा थेट आरोप श्री. पकडे यांनी केला. तोटावार यांना या कामात त्या वेळी अमरावती येथे कार्यरत व सध्या नाशिक विभागात प्रशासनिक अधिकारी असलेले गजानन पाटील यांनी सहकार्य केले,

Corruption
Lumpy Skin : यंदाच्या गळीत हंगामावर ‘लम्पी स्कीन’चे सावट

असाही त्यांचा आरोप आहे. संपत्तीची चौकशी करण्याची मागणी यापूर्वी सुद्धा याच कार्यालयातील तत्कालीन सहसंचालक सुरेश आंबुलगेकर यांनी कृषी सेवक भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केला होता. हे प्रकरण त्या वेळी महाराष्ट्रभर चर्चेत आले होते. परंतु कोणतीच कारवाई होण्याऐवजी त्यांना संचालक पदावर त्या वेळी बढती मिळाली होती.

त्याची दखल घेत सक्‍त वसुली संचलनालयाच्या सक्षम अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी श्री. पकडे यांनी केली आहे. पकडे यांचे आरोप कोणत्याही तथ्यावर आधारित नाहीत. आर्थिक वसुली झाली असेल,

तर संबंधितांनी नियमानुसार त्याच वेळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करणे अपेक्षित होते. आता पदभार सोडून काही महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर अशाप्रकारचे आरोप करणे चुकीचे आहे.

- शंकर तोटावार,

तत्कालीन कृषी सहसंचालक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com