Maharashtra Monsoon Session : घरात ठेवलेल्या कापसाचे करायचे काय ? विधान परिषदेत कापूस दरावरून खडसे-महाजन यांच्यात खडाजंगी

Maharashtra Vidhan Parishad Live : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कापसाच्या दरावरून अधिवेशनात विरोधक आज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विधानपरिषदेत एकनाथ खडसे यांनी कापसाच्या दरावरून राज्य सरकारला धारेवर धरले आहे.
Monsoon Session
Monsoon SessionAgrowon

Girish Mahajan vs Eknath Khadse :'राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे. गुरुवारी विधानपरिषदेच्या सभागृहामध्ये कापूस दरावरून (cotton rate) राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर देत असताना खडसेंना टोमणा मारला. त्यामुळे सभागृहामध्ये काहीसा गोंधळ पाहायला मिळत आहे.

Monsoon Session
Monsoon Session : विजय वड्डेटीवार यांची दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेतेपदी निवड
Monsoon Session
Monsoon Session : खतांच्या किमतीवरुन विधानसभेत खडाजंगी

खडसे म्हणाले, कापूस काढण्यावेळी ११-१२ हजार रुपये असलेला भाव आज ६-७ हजारांवर आला आहे. सरकारने खरेदी बंद केली आहे. काही दिवसांत नवीन कापूस येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरात ठेवलेल्या कापसाचे करायचे काय? पेरे तुमच्याकडे आहेत. त्यामुळे सरकाराने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ६ हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी केली.

दरम्यान, सभागृहात मंत्री गिरीश महाजन येताच खडसे यांनी दहा वर्षांपूर्वी महाजनांच्या आंदोलनाची आठवण करून दिली. त्यावेळी महाजनांनी कापसाला भाव मिळवा, म्हणून १० दिवस आंदोलन केले होते. त्यामुळे आता ते सत्ताधारी गटामध्ये आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, असे म्हटले जाते. म्हणून त्यांनीच उत्तर दिलं तर बरं होईल. सभागृह संपायच्या आत कापूस उत्पादकांना काय न्याय देणार का हे जाहीर करावे, असे सांगितले.

त्यावर उत्तर देत असताना महाजन यांनी सांगितले, हंगामाच्या सुरुवातीला चांगला भाव होता. परंतु सध्या कापसाला अतिशय कमी भाव मिळत आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी कापूस निर्यातीबाबत चर्चा केली आहे. त्याचवेळी 'तुम्ही माझ्या पदाची चर्चा करु नका, असे सांगून खडसेंवर टिका केल्याने सभागृहात गोंधळ झाला. त्यावेळी उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मध्यस्थी करत कापूस दराचा विषय गंभीर आहे. त्यामुळे सरकारने अधिवेशन संपण्याअगोदरयोग्य त्या उपाय योजना कराव्या, अशा सूचना केल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com