
Vijay Wadettiwar : राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या बंडानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काॅंग्रेसचे आमदार विजय वड्डेटीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा सभागृहात केली आहे. त्यानंतर सर्व पक्षांच्या सदस्यांनी त्यांचं अभिनंदन केले.
महाराष्ट्रात मागील दोन वर्षांपासून अनेक राजकीय उलथापालथीमुळे झाल्या. त्यामध्ये शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षामध्ये फूट पडली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. शरद पवार गटाकडून राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची शिफारस केली होती. परंतु अजित पवार यांना राष्ट्रवादीतील बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असल्याने विरोधी बाकावर राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी होते. त्यामुळे काॅंग्रेसकडून विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेते पदावरील दाव्याचे पत्र मागे घेतले.
पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासून विरोधी पक्षनेते पदासाठी बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे आदी नेत्यांच्या नावाची चर्चा होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी काॅंग्रेस पक्षनेष्ठींनी विजय वड्डेटीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. राज्यातील काॅंग्रेस पक्षातील नेत्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विरोधी पक्षनेते पदी विजय वड्डेटीवार यांची निवड करण्याचे पत्र दिले होते. त्यांनी आज विधिमंडळात नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेत्याची घोषणा केली. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह विधानसभेतील सर्वच सदस्यांनी त्यांचे स्वागत केले.
२०१९ मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राजीनामा देऊन फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेते पदावर विजय वड्डेटीवार यांची निवड झाली होती. आता पुन्हा अजित पवार यांच्यानंतर वड्डेटीवार यांच्या खांद्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी मिळाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.