Oxygen : ‘ऑक्सिजन कायमस्वरूपी विकत घ्यावा लागू नये’

Latest Marathi News : आता प्रसंगानुरूप विकत घ्यावा लागणारा ऑक्सिजन कायमस्वरूपी विकत घ्यावा लागू नये यासाठी सर्वांनी मिळून हवेतील प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करण्याची गरज महापालिका प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत यांनी व्यक्त केली.
G. Shrikant
G. ShrikantAgrowon
Published on: 
Updated on: 

Chhatarpati Sambhajinagar News : अमेरिकेच्या हिलरी क्लिंटन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आल्या तेव्हा सुविधायुक्त हॉटेलमध्ये न राहता फार्म हाउसवर राहिल्या. यातून केवळ सुविधाच नाही तर रहिवासी भागासाठी शुद्ध हवा महत्त्वाची असल्याचे स्पष्ट होते.

त्यामुळे आता प्रसंगानुरूप विकत घ्यावा लागणारा ऑक्सिजन कायमस्वरूपी विकत घ्यावा लागू नये यासाठी सर्वांनी मिळून हवेतील प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करण्याची गरज महापालिका प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत यांनी व्यक्त केली.

G. Shrikant
Agriculture Department : कृषी विभागाकडून पेरणी क्षेत्राची आकडेवारी आली समोर

असर सोशल इम्पॅक्ट ॲडव्हायझर्स आणि यूएसआयडी यांच्यातर्फे एअर बेटर हेल्थ प्रोजेक्ट अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पत्रकारांसाठी मंगळवारी (ता. ४) हॉटेल ॲम्बेसिडर अजंता येथे मीडिया लीडरशिप वर्कशॉप ऑन एअर क्वालिटी, ही एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.

G. Shrikant
Indian Agriculture : ‘बर्मुडा ट्रॅंगल’मध्ये फसलेले शेतकरी

या कार्यशाळेत स्वच्छ हवेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे उपक्रम आणि नागरिकांकडून अपेक्षित पाठिंबा, या विषयावर आयुक्त बोलत होते. या कार्यशाळेला असरचे विराट सिंग, यूएसआयडीचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्पेशलिस्ट सौमित्र दास, तनुश्री गांगुली, डॉ. प्रकाश मुंडे, गुफरान बेग, डॉ. श्रीहास बर्दापूरकर, मनीषा चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

जी. श्रीकांत म्हणाले, की कोरोनाचे संकट आले त्या वेळी आपल्याला स्वच्छ हवेचे महत्त्व कळले. शुद्ध हवाच घेतली जावी म्हणून मास्क लावण्याची वेळ आली. ते संकट गेले तरी अजूनही काही शहरांमध्ये मास्क लावण्याची वेळ आहे, हे चिंता करण्यासारखे आहे.

महापालिकेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती आराखड्यांतर्गत विविध माध्यमांतून आम्ही काम करत आहोत. शहरात प्रत्येक पाच किलोमीटरवर हवा शुद्धता तपासण्यासाठी डिवाइस लावली जाणार आहेत. पुढच्या पिढीला नेमकी शुद्ध हवा द्यायची की मास्क द्यायचे हे ठरवून सर्वांना मिळून काम करावे लागेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास जोशी यांनी तर आभार बद्री चटर्जी यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.