Basmati Rice : परदेशातील निर्यातीमुळे बासमतीचे दर सुधारले

उत्पादन घटल्याचा परिणाम
Basmati Rice
Basmati RiceAgrowon
Published on
Updated on

वाशी ः दिवाळीपासून घाऊक बाजारात तांदळाची आवक मोठ्या प्रमाणात होते. त्यानुसार यंदाही मुंबई घाऊक बाजारात तांदूळ यायला सुरुवात झाली आहे. मात्र, बासमतीच्या दरात सध्या परदेशात होणाऱ्या निर्यातीच्या तुलनेत कमी झालेल्या उत्पादनामुळे घाऊक बाजारात किलोमागे १० ते १५, तर किरकोळ बाजारात २० ते २५ रुपयांनी सुधारले आहेत.

Basmati Rice
Soybean Market : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर सुधारले

वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारात तांदळाची आवक सुरू झाली आहे. मे महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात ही आवक होत राहणार आहे. सध्या घाऊक बाजारात पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमधून तांदळाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे; तर महाराष्ट्रातील गोंदिया, चंद्रपूरमधूनही तांदूळ येतो. घाऊक बाजारात तांदळाची मासिक आवक सरासरी तीन ते चार लाख क्विंटल इतकी आहे. यामध्ये बासमती तांदळाची आवक सरासरी पंचावन्न ते साठ हजार क्विंटल इतकी असते. मागच्या दोन वर्षांत लॉकडाऊनमुळे बासमती तांदळाची मागणी नसल्याने दर पन्नास टक्क्यांनी घसरले होते.

Basmati Rice
Poultry : चिकनचे दर का सुधारले ?

लग्नसराईमुळे अधिक मागणी

बासमती तांदळाला दररोजच्या जेवणासाठी मागणी कमीच असते. पण या तांदळाचा सुगंध आणि चवीमुळे सण-समारंभ, उत्सव, कार्यक्रमांमध्ये या तांदळाला अधिक मागणी असते. अशातच सध्या लग्नसराईही सुरू आहे. त्यामुळे केटरिंग, हॉटेल चालकांकडून बासमतीला मागणी आहे. शहरात सण-समारंभ, लग्न आणि इतर कार्यक्रमही आता उत्साहाने होत आहेत.

Basmati Rice
मानवत बाजारात कापसाचे कमाल दर सुधारले

बासमती तुकडा तांदळाच्या भावातही ७ ते १० रुपयांची वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये बासमती तुकडा ३१ ते ४१ रुपये प्रतिकिलो होता. आता तो ४० ते ६० रुपये प्रतिकिलो झाला आहे. तसेच यंदा बासमतीचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात आवक कमी होत आहे. त्यामुळे घाऊक बाजारात काही प्रमाणात बासमती तांदळाचे दर सुधारले आहेत.

- भरत भानुशाली, व्यापारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com