Team Agrowon
प्रचलित बांबू (Bambu Farming) विक्रीपेक्षा वजनाप्रमाणे साधारण दुप्पट पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. हा अभिनव उपक्रम वेल्हे तालुक्यामध्ये प्रथमच राबविला जात आहे.
बांबू तोडणी, भराई व वाहतूक याचा अतिरिक्त खर्च खरेदीदार कंपनीकडून करण्यात येणार आहे.
या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेत. दररोज साधारण २० टन बांबू खरेदीचा करार करण्यात आला आहे.
यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता असून, आपल्या उत्पादनाला चांगला दर मिळून जास्तीचे पैसे मिळतील.
तसेच पाल्यासह बांबूच्या काड्या व शेंडा या भागांना देखील एकच दर मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सदरच्या कच्च्या बांबूपासून बांबूचे पॅलेट तयार करण्यात येणार असून, याचा उपयोग जैविक इंधन म्हणून करण्यात येणार असल्याची माहिती तोरणा ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष श्रीरंग चोरघे यांनी दिली.