Kharif Sowing : पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील खरीप पेरण्या खोळंबल्या

Kharif Season 2023 : पुणे विभागातील चित्र, नगरमध्ये अवघ्या २२८ हेक्टरवर पेरण्या
Kharif Sowing Update
Kharif Sowing UpdateAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Kharif Sowing Update : पुणे ः जूनचा अर्धा महिना ओलांडला तरी अजूनही पावसाचा पत्ता नसल्यामुळे पुणे विभागात खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत.

आत्तापर्यंत सरासरीच्या दहा लाख ६५ हजार ४८ हेक्टरपैकी अवघ्या २२८ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.

येत्या आठवड्यात पाऊस न झाल्यास पेरणीच्या क्षेत्रात घट होऊन शेतकरी चांगलाच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांच्या काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पूर्वमोसमी पाऊस झाला होता. विभागात एक ते ८ जून या कालावधीत नगरमध्ये १२.३ मिलिमीटर, पुणे १२.४ मिलिमीटर, तर सोलापूरमध्ये ४.४ मिलिमीटर पाऊस पडला.

त्यामुळे शेतकऱ्यांनी काही प्रमाणात खरिपाची तयारी सुरू केली होती. अनेक भागांत शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेत नांगरणी व वखरणी करून ठेवली आहे.

मात्र गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले असून, पावसाअभावी शेतीचे कामे थांबल्याची स्थिती आहे.

Kharif Sowing Update
Kharif Sowing : पूर्व हवेलीत पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, तर उत्तरेकडील खेड, जुन्नर, आंबेगाव, तसेच नगर जिल्‍ह्यातील अकोले तालुक्यात प्रामुख्याने भाताची लागवड केली जाते. त्यासाठी कृषी विभागाकडून बियाण्यांचा पुरवठा कृषी विभागाने केला आहे.

भात लागवडीसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भात रोपवाटिका तयार होतात. यंदाही मोठ्या प्रमाणात भात रोपवाटिका मोठ्या प्रमाणात होणार असल्याची शक्यता आहे.

Kharif Sowing Update
Kharif Sowing : राज्यात खरीप पेरण्या वेगात

मात्र जून महिन्याचे १६ दिवस ओलांडले तरी पुरेसा पाऊस झालेला नाही. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलामुळे शेतकरी पावसाची वाट पाहत असले तरी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय रोपवाटिकेची कामे हातात घ्यायला नको, अशा मनःस्थितीत शेतकरी आहेत.

उर्वरित सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यांतील भात पट्ट्यातील तालुके वगळता शेतकऱ्यांनी चांगला पाऊस होईल या अपेक्षेने खते, बियाण्यांची खरेदी सुरू केली असल्याचे दिसून येते. मात्र पावसाने हजेरी न लावल्याने खते, बियाणे तसेच पडून असल्याचे चित्र आहे.

पुणे विभागात आतापर्यंत झालेली पेरणी (हेक्टरमध्ये)
पीक -- क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तूर --- ५५
कापूस -- १७३
एकूण -- २२८

Kharif Sowing Update
Kharif Sowing : पूर्व हवेलीत पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

पुणे विभागातील खरिपाचे पीकनिहाय सरासरी, हेक्टरमध्ये
भात ७७,०५७, खरीप ज्वारी ७१,२१२, बाजरी २,३८,००९, रागी ३०,५१, मका १,१४,९८०, इतर खरीप तृणधान्ये २,०२४, तूर १,२४,५०७, मूग ७९,२६८, उडीद ८८,५९८, इतर खरीप कडधान्ये १८,११०, भुईमूग २७,९४१, तीळ ५७९, कारळे ११३६, सूर्यफूल ९३७४, सोयाबीन १,५५,३७८, इतर तेलबिया १०७०, कापूस १,२२,७५४

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com