Koyna Dam: भविष्यात पाण्याचा प्रश्न गंभीर ? कोयना, चांदोलीसह कोल्हापूरच्या धरणांची स्थिती अशी

Krushna River : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांत पाऊस थांबल्याने नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे.
Koyna Chandoli Kalmmawadi dam
Koyna Chandoli Kalmmawadi damagrowon
Published on
Updated on

Koyna Chandoli Kalmmawadi Dam : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात मागच्या दोन आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. दरम्यान दोन दिवसांपासून पाऊस कमी झाल्याने तिन्ही जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत घट झालीय.

कोयना, चांदोली आणि राधानगरी धरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने धरणांतील पाणी वाढत आहे. तर अलमट्टी धरणातून ७५ हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग होत असल्याने पंचगंगा आणि कृष्णेचा पूर ओसरत असल्याची स्थिती आहे. यामुळे महापुराचा धोका टळला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याती धरणांची अशी आहे स्थिती

कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून पावसाने थोडी उसंत घेतली. यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळीमध्ये झपाट्याने घट होत आहे. जिल्ह्यात मागच्या २४ तासांत जवळपास २० बंधारे खुले झाले तर अडीच फुटांनी पाणी कमी झाले. कोल्हापूर आणि गगणबावड्याला जोडणारा बालिंगा पूल सर्व वाहनांसाठी कालपासून खुला करण्यात आला.

जिल्ह्यातील दहा नद्यांवरील अद्याप ३१ बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा दरवाजा खुलाच असून धरणातून सध्या २८२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पावसाचा जोर कमीच राहीला तर येत्या चार-पाच दिवसांत जिल्ह्यातील पूरस्थिती पूर्ण ओसरेल, अशी शक्यता आहे.

जिल्ह्यातील राधानगरी धरण १०० टक्के भरले आहे तर जिल्ह्यातील सर्वात मोठे काळम्मावाडी धरण अद्याप ७० टक्क्यांवर आहे. याचबरोबर जिल्ह्यातील लहान मोठी जवळपास सर्वच धरणे १०० टक्क्यांच्या आसपास भरली आहेत.

दरम्यान काळम्मावाडी धरण मागच्या वर्षी ७५ टक्के भरले होते. यंदाही हीच परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पूढच्या १ वर्षात शेती आणि पिण्याच्या पाण्याची जवळपास चिंता मिटली आहे.

मागच्या २४ तासांत राधानगरी धरण परिसरात केवळ २० मि.मी. पाऊस झाला. तुळशीत अवघा ८ मि.मी., वारणेत ४, दूधगंगेत ९, कुंभीत १६ तर कासारीत ३७ मि.मी. पाऊस झाला. पाटगावमध्ये ४२ तर घटप्रभेत ४३ मि.मी. पाऊस झाला.

जिल्ह्यात रविवारी सकाळी अकरापर्यंत गेल्या २४ तासांत केवळ ७.७ मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ३३.५ मि.मी. तर भुदरगडमध्ये २०.८ मि.मी., राधानगरीत १४.२, शाहूवाडीत १३, पन्हाळ्यात १० तर चंदगड तालुक्यात ९ मि.मी. पावसाची नोंद झाली.

Koyna Chandoli Kalmmawadi dam
Kolhapur Flood : कोल्हापुरकरांना महापुराची धास्ती, वाहने लावली थेट रस्त्यांवर

कोयना परिसरातील पाऊस थांबला

सातारा जिल्ह्यात काल रविवारपासून पाऊस थांबला असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी काहीशी गर्दी केली होती. तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी कोसळत होत्या. सातारा जिल्ह्यात गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा वेग कमी झाला यामुळे धरण व्यवस्थापनाकडून पायथा वीजगृहातून कोयना नदीतील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. यापूर्वी कोयना नदीत प्रतिसेकंद २ हजार १०० क्युसेस इतका विसर्ग केला जात होता. मात्र आता प्रतिसेकंद १ हजार ५० क्युसेस इतकाच विसर्ग सुरू ठेवण्यात आला. दरम्यान, कोयना धरणाचा पाणीसाठा ७१.३३ टीएमसी इतका झाला आहे.

Koyna Chandoli Kalmmawadi dam
Koyna Protest : आकाशातला चंद्र नको, आम्हाला आमच्या हक्काचं तेवढं द्या; कोयना धरणग्रस्तांचं आमरण उपोषण

कृष्णेच्या पाणीपातळीत घट

सांगली जिल्ह्यात मागच्या तीन दिवसांपासून पाऊस पूर्णत थांबला यामुळे कृष्णा आणि वारणेची पाणी पातळी कमालीची घट झाली आहे. कोयनेतून अद्याप १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर अलमट्टी धरणातून आता ७५ हजार क्युसेकपर्यंत विसर्ग कमी करण्यात आला आहे.

सांगलीतील आयर्विन पुलाजवळ रविवारी पाणी पातळी सायंकाळी ५ वाजता सोळा फूट ६ इंच तर अंकलीजवळ पाण्याची पातळी २३ फूट ७ इंच होती. कृष्णा घाट मिरज येथे ३२ फूट ३ इंच होती.

चांदोली परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात पाण्याची आवक शनिवारपेक्षा रविवारी निम्याहून अधिक कमी झाली आहे. सध्या धरणात प्रतिसेंकद ५४२५ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. धरणातील पाणीसाठा २९.१३ टीएमसी म्हणजे ८५ टक्के धरण भरले आहे.

शनिवारी धरणात ११७०९ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. रविवारी ५४२५ क्युसेकने सुरू आहे. दोन दिवसांत धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ६० टक्क्यांनी घटली. धरणातून वारणा नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग कमी होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com