
नातेपुते, जि. सोलापूर ः ‘‘बहुचर्चित आणि लक्षवेधी फलटण ते पंढरपूर रेल्वे (Phaltan-Pandharpur Railway) मार्गासाठी येत्या आठ दिवसांत राज्य सरकारच्या हिश्श्याचा ५० टक्के म्हणजे सुमारे ६०० कोटी रुपयांचा निधी (Fund) राज्य सरकारकडून केंद्राला दिला जाईल,’’ असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिले.
स्वातंत्र्यपूर्व काळातच मंजूर असलेल्या आणि विशेष म्हणजे या मार्गावरील सर्व जमिनींचे भूसंपादन झालेल्या लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाची मागणी सातत्याने होते आहे. स्वातंत्र्यानंतर लोणंद ते फलटण एवढाच मार्ग पूर्ण झाला. पण त्यानंतरचा फलटण ते पंढरपूर हा जवळपास १०९ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग अद्यापही पूर्ण झालेला नाही. पण तेवढ्या प्रमाणात राजकीय रेटा होत नसल्याने या मार्गाचे काम काही होत नाही, असे चित्र आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही या कामासाठी सतत पाठपुरावा केला. त्यांच्याच पाठपुराव्यामुळे आता लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाचे काम सुरू होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या हिश्शाचा ५० टक्के म्हणजे ६०० कोटी रुपयांचा निधी फडणवीस यांनी देण्याचे कबूल केले आहे. जिल्ह्यातील याच मार्गाचे नव्हे, तर अशा पद्धतीने राज्य हिश्शाच्या निधीपोटी रखडलेल्या प्रकल्पांचा ५० टक्के निधी देण्यात येणार आहे. त्यासंबंधीचे आश्वासन खासदार नाईक निंबाळकर यांना फडणवीस यांनी दिले आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या रेल्वेमार्गाच्या आशा वाढल्या आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.