Agricultural Upnati Yojana : ‘महाबीज’ चे हरभरा, गहू बियाणे अनुदानावर उपलब्ध

केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विभागाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (प्रमाणित बियाणे वितरण) व कृषी उन्नती योजना (ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम)अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यासाठी रब्बी हंगामासाठी एक हजार १४३ क्विंटल हरभरा व ७२५ क्विंटल गव्हाचे प्रमाणित बियाणे अनुदान उपलब्ध करून दिले असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर यांनी केले आहे.
Agricultural Upnati Yojana
Agricultural Upnati YojanaAgrowon
Published on
Updated on

नंदुरबार : केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विभागाने राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (प्रमाणित बियाणे वितरण) व कृषी उन्नती योजना (Agricultural Upnati Yojana) (ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम)अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यासाठी रब्बी हंगामासाठी एक हजार १४३ क्विंटल हरभरा व ७२५ क्विंटल गव्हाचे प्रमाणित बियाणे अनुदान उपलब्ध करून दिले असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर यांनी केले आहे.

प्रमाणित बियाणे वितरणअंतर्गत पाच एकर व ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम या योजनेंतर्गत एक एकर बियाणे अनुदानावर देण्यात येणार आहे. २० किलो बियाण्यावर ५०० रुपये अनुदान, तर एक एकरसाठी शेतकरी हिस्सा ९०० रुपये राहील.

Agricultural Upnati Yojana
Orange Crop Insurance: संत्रा उत्पादकांचे आज मंथन बैठक

कृषी उन्नती योजना हरभरा दहा वर्षांच्या आतील वाण बियाणे राजविजय-२०२, फुले विक्रम, फुले विक्रांत, एकेजी-११०९ (पीडीकेव्ही कांचन) एक एकरसाठी लागणाऱ्या २० किलो बियाण्यावर ५०० रुपये अनुदान, तर एक एकरसाठी शेतकरी हिस्सा ९०० रुपये राहील.

बीडीएनजीके-७९८ (काबुली)साठी एक एकरसाठीच्या ३० किलो बियाण्यावर ७५० रुपये अनुदान, तर एक एकरसाठी शेतकरी हिस्सा दोन हजार ५५० असेल. हे बियाणे जिल्ह्यातील महाबीज बियाणे विक्रेत्यांकडे उपलब्ध करून दिलेले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com