
पालघर : पश्चिम रेल्वेच्या विरार-डहाणू चौपदरी करण्याचे काम संथगतीने सुरू आहे. अपुरा निधी, रेंगाळलेले भूसंपादन (Land Acquisition) व अन्य काही तांत्रिक समस्यांमुळे एमयूटीपी- ३ अंतर्गत प्रकल्पाच्या कामांची गती मंदावली आहे. सध्या विरार-डहाणूदरम्यान दोनच मार्गिका असून या मार्गावरून लोकलबरोबरच मेल एक्स्प्रेसही धावतात. त्यामुळे लोकांच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे. हे चौपदरीकरण लवकरात लवकर करावे, अशी मागणी डहाणू-वैतरणा रेल्वे प्रवासी सेवाभावी संस्थेने केली आहे.
पश्चिम रेल्वे सध्या एक्स्प्रेस गाड्यांची वाढ करीत असून उपनगरीय रेल्वे गाड्या मात्र वाढवल्या जात नाहीत. त्यातच एक्स्प्रेस गाड्यांमुळे उपनगरीय गाड्या नेहमीच उशिरा पोहचत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांची मात्र मोठी कुचंबणा होत आहे.
लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत राहावे यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्प हाती घेतला आहे; मात्र या प्रकल्पात २४ हजार खारफुटींची झाडे अडसर बनली आहेत. ही खारफुटी झाडे तोडण्यात येणार असून त्यासाठी मुं याचिका करण्यात आल्याची माहिती एमआरव्हीसी अधिकाऱ्याने दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.