Sugarcane Season : ऊसतोड मुकादमांकडून ४४६ कोटींची फसवणूक

राज्यामध्ये ऊस वाहतूकदारांना ऊसतोडणी मजूरपुरवठा करण्यासाठी १० हजारांहून अधिक मुकादमांकडून गेल्या दोन वर्षांत ४४६ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.
Sugarcane Season
Sugarcane SeasonAgrowon

Sugarcane Season Mumbai : राज्यामध्ये ऊस वाहतूकदारांना ऊसतोडणी मजूरपुरवठा करण्यासाठी (Sugarcane Labor Supply) १० हजारांहून अधिक मुकादमांकडून (Sugarcane Harvesting Contractor) गेल्या दोन वर्षांत ४४६ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.

या मुकादमांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेच्या वतीने पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडे करण्यात आली.

या वेळी राजू शेट्टी आणि सेठ यांच्यात चर्चा झाल्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पोलिस प्रमुखांना तातडीने कारवाईचे निर्देश देण्यात आले. तसेच ज्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत, तेथे तातडीने कारवाई होईल, असे आश्‍वासनही देण्यात आले.

दरवर्षी हजारो वाहनधारकांना कोट्यवधी रुपयाचा गंडा या मुकादमाकांकडून घालण्यात येतो. त्यामुळे अशा फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर तातडीने कारवाई करून जिल्हानिहाय स्वतंत्र पोलिस पथक नेमा, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

‘स्वभिमानी’च्या निवेदनानुसार, हंगाम सुरू होत असताना दरवर्षी ऊसतोडणी करण्यासाठी एका वाहनधारकास मजूर उपलब्ध करून देण्याकरिता १० ते १५ लाख रुपयाचा अॅडव्हान्स रक्कम मुकादमाकांकडून घेतली जाते.

हे मुकादम एका ऊस तोड मजुराच्या टोळीसाठी तीन ते चार वाहनधारकांकडून अॅडव्हान्स घेऊन एका वाहनधारकास मजूर उपलब्ध करून देतात. उर्वरित वाहनधारकांची अॅडव्हान्स घेऊन फसवणूक करतात.

राज्यात हजारो वाहनधारक या फसवणुकीचे बळी पडले असून, अनेक वाहनधारक यामुळे आत्महत्या करू लागले आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे, असे निवेदनात नमूद आहे.

Sugarcane Season
Sugarcane Production : ऊस उत्पादनासह लागवड क्षेत्रही घटले

या वेळी स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी पृथ्वीराज पवार, संदीप राजोबा, प्रवीण शेट्टी, शिवाजी पाटील, रावसाहेब अबदान, आनंदा फराकटे, युवराज माळी, श्रीकृष्ण पाटील, दादासो पाटील, गणेश गावडे, धन्यकुमार पाटील, विनोद पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Sugarcane Season
Sugarcane Production : ऊस उत्पादकांना मानसिकता बदलावी लागेल

ऊस वाहतूकदारांवर खोटे गुन्हे

वाहनधारकांच्या वतीने फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मात्र राजकीय वरदहस्त आणि गुंडगिरी यामुळे संबंधित मुकादमांवर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.

दिवसेंदिवस असे प्रकार वाढत असून, राज्यातील ऊस वाहतूकदार मोठ्या आर्थिक संकटात सापडत आहे.

वसुलीसाठी गेलेल्या वाहनधारकांना मारहाण, विनयभंग, दरोडा यांसारख्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे. दिवसेंदिवस हे प्रकार वाढत चालल्याने यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ‘स्वाभिमानी’ने केली आहे.

मुकादमांना शोधण्याच्या सूचना

पोलिस महासंचालक सेठ यांनी राज्यातील सर्व पोलिसप्रमुखांना सूचना दिल्या. दरम्यान, ज्या ठिकाणी गुन्हे नोंद झालेले आहेत, त्या मुकादमांना शोधण्यासाठी पोलिस यंत्रणा गतिमान करण्याचे निर्देशही दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com