Sugarcane Production : ऊस उत्पादनासह लागवड क्षेत्रही घटले

यावर्षी केवळ ४९ हजार ५८० टन इतकाच ऊस उत्पादित झाला आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील ऊसशेतीसमोर प्रश्नचिन्ह उभे राहण्याची चिन्हे आहेत.
Sugarcane
Sugarcane Agrowon
Published on
Updated on

Sindhudurg : जिल्ह्यात ऊस उत्पादन एकरी अवघे १५ ते १७ टनच मिळत असल्यामुळे उसाकडील शेतकऱ्यांचा कलदेखील कमी होऊ लागला असून १७०० हेक्टरवर पोहोचलेले क्षेत्र आता ११६० हेक्टरवर आले आहे.

यावर्षी केवळ ४९ हजार ५८० टन इतकाच ऊस उत्पादित (Sugarcane Production) झाला आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील ऊसशेतीसमोर (Sugarcane Farming) प्रश्नचिन्ह उभे राहण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यातील वैभववाडी आणि कणकवली या तालुक्यांत झपाट्याने ऊसलागवड क्षेत्र वाढले होते. २००४ मध्ये केवळ ५० ते ६० एकर असलेले क्षेत्र काही वर्षातच १७०० हेक्टरवर पोहोचले. याशिवाय ऊस उत्पादनातदेखील लाखांचा टप्पा पार केला.

Sugarcane
Sugarcane Crushing : खानदेशात ऊस गाळप हंगाम पूर्णत्वाकडे

परंतु गेल्या पाच-सहा वर्षात विविध कारणांमुळे ऊसशेतीला ग्रहण लागले आहे. एकीकडे ऊस उत्पादनात प्रचंड घट झाली असून लागवडीकडील कलदेखील कमी होऊ लागला आहे.

या वर्षीचा गाळप हंगाम ५ मार्चला पूर्ण झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११६० हेक्टरवरील लागवडीमधून केवळ ४९ हजार ८५० टन ऊस उत्पादन झाले. त्यामुळे जिल्ह्याची एकरी १७ टन उत्पादकता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Sugarcane
Sugarcane FRP : ऊस उत्पादकांना संपूर्ण एफआरपी रक्कम अदा करावी

त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या येथील शेतकऱ्यांना ते परवडत नाही ही वस्तुस्थिती आहे. साधारणपणे एकरी ४० टन उत्पादन मिळाले तरच शेतकऱ्यांना ऊसशेती परवडेल, असा ऊस अभ्यासकांचा दावा आहे. गेली दोन-तीन वर्षे ऊसतोडणीला होत असलेला विलंब यामुळेदेखील ऊस उत्पादनात घट होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जाते.

गेल्या काही वर्षांतील स्थिती

वर्ष ऊस उत्पादन (टनांत)

२०२० ६३२१५

२०२१ ५५०६३

२०२२ ४९५१२

२०२३ ४९८५

ऊस उत्पादन कमी येत आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे नापणे ऊस संशोधन केंद्राच्या माध्यमातून आम्ही जातीची निवड, ऊस लागवड व्यवस्थापन, खत व्यवस्थापन याबाबत काम सुरू केले आहे. याशिवाय जमिनीचा पोत वाढविण्यावरदेखील अभ्यास सुरू आहे.

- डॉ. विजय शेट्ये, प्रकल्प अधिकारी, ऊस संशोधन केंद्र नापणे

माती परीक्षण, लागवडीसाठी शुद्ध पायाभूत बियाण्यांचा वापर, चार फूट सरी पद्धतीचा अवलंब, संतुलित खतांचा वापर, सेंद्रिय व जैविक खतांचा वापर, पाणी व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होईल. याशिवाय तणनियंत्रणदेखील केले पाहिजे. परंतु या गोष्टीकडे शेतकरी दुर्लक्ष करीत असल्यामुळे उत्पादनात घट होत आहे.

- सुनील पाटील, ऊस विकास अधिकारी, साखर कारखाना.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com