Dairy Business : नोकरी सोडून युवक रमला दुग्ध व्यवसायात

Dairy Farming : पुण्यात खासगी कंपनीत असलेले व वर्षाला चांगले आर्थिक पॅकेज’असलेले मधुकर निकम हा युवक कोवीड काळात नोकरी सोडून गावी नादरपूरला (जि. छत्रपती संभाजीनगर) परतला. घरचा बंद पडलेला दुग्धव्यवसाय त्याने मोठ्या उमेदीने सुरू केला.
Dairy Business
Dairy Business Agrowon

Success Story of Dairy Business : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नादरपूर (ता. कन्नड ) येथील मधुकर निकम यांच्या कुटुंबाची वीस एकर शेती आहे. पत्नी हर्षदा, आई जिजाबाई, वडील दादाराव, मोठे बंधू राहुल, वहिनी आरती व दोन्ही भावंडांची मिळून दोन मुले व एक मुलगी असे कुटुंबात नऊ सदस्य आहेत.

आठ ते दहा एकर मका, चार ते पाच एकर आले, पाच एकर कपाशी, बाकी क्षेत्रात चारापीक, चिकूबाग व पाण्याच्या उपलब्धतेनुसार ऊस असतो. वडील समाजकारण व बंधू खडी क्रशिंग व्यवसाय सांभाळतात. सिंचनासाठी चार विहिरी असून २०१८-१९ पर्यंत एक शेततळे होते.

पुन्हा सुरू झाला दुग्ध व्यवसाय

मधुकर यांचे वडील दादाराव १९८० पासून वडिलोपार्जित दुग्धव्यवसाय करायचे. नऊ संकरित गायींपर्यंत त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला. मात्र अन्य संकटांसोबतच मजुराच्या प्रमुख समस्येमुळे २००० च्या दरम्यान तो बंद करावा लागला. केवळ दोन गाई घरच्या दुधासाठी ठेवल्या. मधुकर यांनी पुणे विद्यापीठातून ‘एमसीए’ची पदवी घेतली. एका खासगी कंपनीत प्रति वर्ष काही लाख रुपये ‘पॅकेज’ची नोकरी त्यांना लागली होती. सारं सुरळीत असताना कोवीडचे संकट आले.

त्यावेळी मधुकर यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. शेती सांभाळण्यासोबतच अन्य काय करावे या विचारात असताना घरचा बंद पडलेला दुग्ध व्यवसाय पुन्हा सुरू करून पाहू असे त्यांनी ठरवले. व्यवसायातील अर्थकारणाचा त्यादृष्टीने अभ्यास सुरू केला. त्यानंतर कुटुंबाकडील दोन गाईंचा दुग्ध व्यवसाय विस्तारण्याचा निर्णय घेतला. जमलं तर पाहू अन्यथा पुन्हा नोकरीवर जाऊ असं त्यांच मन सांगायचं.

Dairy Business
Dairy Business : विदर्भात दुग्ध व्यवसायाला तयार केली बाजारपेठ

व्यवसाय करताना व्यवसायाची वाटचाल

मुक्त गोठ्याचा पर्याय निवडला. १२० बाय ५० फूट आकाराच्या शेडची उभारणी केली. गोठ्याच्या मधोमध सावलीसाठी लिंबाचे झाडही घेतले. पावसाळा वगळता तीन ते चार महिन्यांनी एकदा गोठ्यातील शेणखत ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे गोळा केले जाते. दूध काढण्यासाठी दोन यंत्रांचा वापर सुरू केला आहे. मधुकर तसेच कुटुंबातील महिला सदस्य ही जबाबदारी सांभाळतात.
आज मधुकर व्यवसायात रमले आहेत. टप्प्याटप्प्याने अनुभव व शकत शिकत पुढे जाताना
एकूण लहान मोठ्या मिळून ३६ संकरित गायी (बहुतांशी एचएफ) आहेत. पैकी १६ दुभत्या तर १५ कालवडी आहेत. एक जातिवंत जर्सी कालवड व दोन बैल आहेत.

व्यवस्थापनातील बाबी सांगायच्या तर तापमान नियंत्रणासाठी शेडमध्ये फॉगरचा वापर होतो.
दर दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी प्रत्येक गायीचे तापमान तपासण्यात येते. पावसाळ्यात घटसर्प व हिवाळ्यात लाळ्या खुरकूतची लस दिली जाते. आरोग्याच्या दक्षतेचे पशुवैद्यकाकडून तंत्र शिकून घेतले आहे. टीएमआर (टोटल मिक्स राशन) नुसार खाद्य व्यवस्थापन केले जाते. मुरघासचाही वापर केला जातो. सकाळी पाच ते नऊ तर सायंकाळी चार ते सहा या दोन वेळेत गाईंना निश्चित केलेले खाद्य दिले जाते. अशा पद्धतीमुळे दुधाच्या गुणवत्तेत व उत्पादनात वाढीचा अनुभव आल्याचे मधुकर सांगतात.

Dairy Business
Dairy Business : चाळीस वर्षांची दुग्धप्रक्रियेची यशस्वी परंपरा

अर्थकारण उंचावले

आत्तापर्यंत जवळपास तीन लाख खर्चून मुक्त गोठ्यासह शेडची उभारणी केली. सहा लाख रुपये गुंतवून जवळपास नऊ गायी खरेदी केल्या. तीन वर्षापासून साधारणतः १२ ते २० पर्यंत गायी सातत्याने कमी अधिक प्रमाणात दुभत्या राहतात. दररोज सुमारे १८० ते दोनशे, २५० लिटर दूध फुलंब्रीच्या खासगी डेअरीला पुरवले जाते.

प्रति दिन १५ ते ४० लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गाई मधुकर यांच्याकडे आहेत. मागील तीन वर्षांत २६ ते ४१ रुपये प्रति लिटरपर्यंत दर दुधाला मिळाला. आताच्या घडीला ३० रुपये दर मिळतो आहे. कंपनीत आठ ते १० तास किंवा त्यापेक्षा जास्त काम करून महिना जेवढे वेतन मिळायचे त्याहून अधिक उत्पन्न आता मधुकर दुग्ध व्यवसायातून मिळवू लागले आहेत. त्याचा त्यांना अभिमान देखील आहे.

कालवडींपासून उत्पन्न

चांगल्या दर्जाच्या सिमेनचा वापर करून उत्तम कालवडींची पैदास गोठ्यात सुरू केली आहे.
जवळपास सात कालवडींची विक्री करून काही लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. त्यामुळे
दुग्धव्यवसायातले अर्थकारण उंचावले आहे. प्रतिवर्षी ४५ ते ५० ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. प्रति एकर ८ ते १० ट्रॉली शेणखताचा शेतात वापर होतो.

त्यातून रासायनिक खतांचा वापर जवळपास ४० ते ४५ टक्क्यापर्यंत कमी झाला असून त्यातील खर्चातही बचत झाली आहे. दरवर्षी जून ते ऑगस्ट, सप्टेंबर ते नोव्हेंबर व डिसेंबर ते फेब्रुवारी अशा तीन टप्प्यांत मुरघासासाठी मका लागवड केली जाते. तीनशे ते साडेतीनशे टन मुरघास त्यातून तयार केला जातो.
गरजेनुसार १३० ते १४० टन गव्हाचा कोंडा किंवा भूस दरवर्षी विकत घेण्यात येते.

संपर्क- मधुकर निकम- ९२८४७४५३३५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com