Jaggery Production : राचन्नावाडीचा प्रसिध्द लालसर, कडक गूळ

Organic Jaggery : लातूर जिल्ह्यातील राचन्नावाडी (ता. चाकूर) या गावाने गूळनिर्मितीत आपली खास ओळख तयार केली आहे. गावातील अनेक शेतकरी अनेक वर्षांपासून घरच्या उसापासून दर्जेदार गूळनिर्मिती करतात.
Jaggery Making Process
Jaggery ProductionAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : लातूर जिल्ह्यात चाकूर ते उदगीर रस्त्यावर चाकूरपासून बारा किलोमीटरवर राचन्नावाडी (ता. चाकूर) हे अडीच हजार लोकवस्तीचे गाव आहे. पूर्वी गावशिवारात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते. जवळपास साखर कारखाना नसल्याने गावात मोजक्या संख्येने शेतकरी गूळ उत्पादन घेत.

सन १९९६ मध्ये गावशिवारात साठवण तलाव झाला. त्यानंतर मात्र अनेक शेतकऱ्यांनी गूळ उत्पादन घेण्यास सुरुवात केली. आजमितीला गावात शंभरहून अधिक शेतकरी गूळनिर्मितीत गुंतले आहेत.

सन २००० मध्ये शेजारील संगाचीवाडी येथेही साठवण तलाव होऊन तेथील शेतकऱ्यांनीही या गावाचे अनुकरण करत गुळाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. दोन तलावांमुळे परिसरातील गावांमध्ये उसाच्या क्षेत्रात वाढ होण्यास मदत झाली. उसाचे एकरी विक्रमी उत्पादन घेणारे शेतकरीही या भागात आढळतात.

परिसरातील नळेगाव (ता. चाकूर) येथील कारखाना बंद झाला. तो पुन्हा सुरू झालाच नाही. अशा कारणांमुळे गुऱ्हाळाची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. काही वर्षांत परिसरात दोन साखर कारखाने सुरू झाले.

तरीही गुळाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली नाही. आता परिसरातील सहा गावांत गुळाचे जणू मिनी कारखानेच ठिकठिकाणी दिसून येत आहेत. या व्यवसायातून शेकडो स्थानिक मजुरांना स्थानिक रोजगार मिळाला असून शेतीचे अर्थकारणही बदलले आहे.

Jaggery Making Process
Agriculture Success Story : ‘पुसला’च्या बिडकर भगिनींनी जपला लढवय्या बाणा

यांत्रिकीकरणामुळे सुलभता

उसाची तोडणी झाल्यानंतर त्याचा रस तयार करण्यात येतो. एक ते सव्वा टन ऊस गाळपाला दीड तासाचा कालावधी लागतो. पंपाच्या साह्याने रस कढईत घेतला जातो. चुलांगणावर दोन ते अडीच तास तापवला जातो. पाक तयार झाल्यानंतर ट्रॅकवरून कढई पुढे नेऊन ती वाफ्यात उलथवली जाते. तिथे अर्धा तास पाक हलवून थंड केला जातो.

त्यानंतर तयार झालेला गूळ डागामध्ये (लोखंडी पेटी) भरला जातो. थोड्या वेळाने डागाचे आवरण काढल्यानंतर ढेप तयार होते. साडेचार तासात असे एक आंदण तयार होते. दिवसाला चार ते पाच आंदणे काढली जातात. प्रति आंदणासाठी सव्वा ते दीड टन ऊस लागतो. त्यापासून अडीच ते तीन क्विंटल गूळ तयार होतो.

भारनियमनामुळे अखंडित विजेचा प्रश्‍न असल्याने शेतकऱ्यांनी जनरेटरचाही पर्याय ठेवला आहे. पूर्वी लागवडी, तोडणी तसेच गाळपापासून ते गूळनिर्मितीपर्यंतची विविध कामे मजुरांच्या साह्याने करावी लागत होती. आता बहुतांश कामांसाठी यंत्रे उपलब्ध झाल्याने मजूरसंख्या निम्म्यावर आली आहेत.

Jaggery Making Process
Agriculture Success Story : प्रयोगशील शेतीमुळे नाईक बनले आदर्श शेतकरी

शेकडो मजुरांच्या हाताला काम

गुऱ्हाळ सुरू होण्यापूर्वीच आगाऊ उचल देऊन मजुरांसोबत करार केले जाता. काही गुऱ्हाळांसाठी मजुरांच्या टोळ्या आहेत. यात स्थानिक मजुरांची संख्या मोठी आहे. दिवाळी संपताच नोव्हेंबरमध्ये चुलवण पेटते. मेअखेरपर्यंत गुऱ्हाळे सुरू राहतात. सुमारे सहाशेपर्यंत मजुरांना सात महिन्यांचा रोजगार गावातच मिळू लागला आहे.

गुऱ्हाळ सुरू नसलेल्या काळात ऊस लागवडीतील तसेच खरीप, रब्बी हंगामाची कामे असतात. त्यामुळे रोजगारासाठी गावातून स्थलांतर करण्याची वेळ त्यांच्यावर येत नाही. काही मजूर आता गूळनिर्मिती प्रक्रियेत इतके कुशल झाले आहेत, की त्यांना गुळवे असेही संबोधले जाते.

गुळासाठी वेगळे वाण

या भागातील शेतकरी खास गूळ उत्पादनासाठी ९१०१० वाणाच्या उसाची लागवड करतात.त्यापासून रसाचा उतारा जास्त मिळतो असा त्यांचा अनुभव आहे. काही शेतकरी १८१२१ व १०००१ या वाणांचीही लागवड करतात. यातून काही शेतकरी गुळासोबत कारखान्यालाही ऊस पुरवठ्याचा पर्याय ठेवतात. बदलत्या लागवड तंत्रज्ञानानुसार काही शेतकऱ्यांनी उसाच्या सरीतील अंतर तीनपासून सात फुटांपर्यंत वाढवले आहे. तोडणीसाठी ‘हार्वेस्टर’ आले आहेत. गूळ दर्जेदार होण्यासाठी ऊस उत्पादनाकडेही शेतकऱ्यांचे बारीक लक्ष असते.

नोकरी सांभाळून गूळ उद्योग

काही शेतकऱ्यांकडे दोनपेक्षा अधिक चुलांगणे आहेत. उसाचे कमी क्षेत्र असलेले शेतकरी अशा शेतकऱ्यांकडून गूळनिर्मिती करून घेतात. त्यांच्याकडून गुऱ्हाळ मालक आंदणामागे भाडेशुल्क घेतात. काही शेतकरी अन्य शेतकऱ्यांकडून ऊस घेऊनही गूळ उत्पादन करतात. गावातील महादेव पाटील पंचायत समितीमध्ये कार्यालय अधीक्षक आहेत.

त्यांचे एक बंधू हणमंत शिरूर अनंतपाळ येथे प्राध्यापक, तर दुसरे बंधू पंडित जळकोट येथे शिक्षक आहेत. आजोबांच्या काळापासून या कुटुंबात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गूळ उत्पादन घेतले जाते. त्यांची पंधरा एकर जमीन असून विहीर व बोअरचे मुबलक पाणी आहे. सर्व क्षेत्रावर ऊस लागवड करून त्याचा पूर्ण वापर गुळासाठीच केला जातो.

बालाजी अंकुलवार (कृषी सहायक) ९४२१४५२७४१

महादेव पाटील (गूळ उत्पादक) ९७६४२७५५९३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com