Agriculture Success Story : कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेला फळ पिकांचे बळ

Article by Chandrakant Jadhav : गोरनाळे (जि. जळगाव) येथील मोहन सीताराम वाघ यांनी काटेकोर व्यवस्थापन, आर्थिक नियोजनातून केळी, कलिंगड, पेरू, पपई इ. फळपिकांसोबतच हळद व कापूस शेती यशस्वी केली आहे.
Sitaram Wagh
Sitaram Wagh Agrowon
Published on
Updated on

चंद्रकांत जाधव

जळगाव जिल्ह्यातील गोरनाळे (ता. जामनेर) हे गाव सूर या नदीकाठी आहे. या गावातील सीताराम वाघ कुटुंबीयांची वडिलोपार्जित २५ एकर शेती आहे. त्यांच्यासह मुले मोहन, जीवन व संदीप असे एकत्रित कुटुंब आहे. त्यातील जीवन हे खासगी कंपनीमध्ये नोकरीला असून, संदीप यांचा हे शेती अवजारे भाडेतत्त्वाने देण्याचा व्यवसाय आहे.

शेतीची मुख्य वित्त व पीकविषयक जबाबदारी ही मोहन यांच्यावर असली तरी अन्य दोघांचेही शेतीत लक्ष असते. हे कुटुंब स्वतःच्या शेतीसोबतच करारावर ३५ एकर शेती कसते. मोहन हे कृषी पदवीधर असून, एबीएम ही पदव्युत्तर पदविका घेतली. कामासाठी चार सालगडी आहेत. सोबतच दोन बैलजोड्या, एक गाय, दोन म्हशी असा बारदाना आहे. आवश्यक त्या अवजारांसह दोन मोठे ट्रॅक्टर आहेत. मोहन यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर हळूहळू सुधारणा करत उत्तम शेतकरी म्हणून पंचक्रोशीमध्ये नाव मिळविले आहे.

पूर्वी सिंचनासाठी दोन कूपनलिका होत्या, पण पाण्याची कमतरता भासत असे. म्हणून ४४ बाय ४४ मीटर व ३० फूट खोल शेततळे घेतले आहे. तसेच दुसरे शेततळे ३४ बाय ३४ फूट आणि ३० फूट खोल अशी दोन शेततळी घेतली आहेत. सोबतच आठ किलोमीटरवरील कापूसवाडी येथील मध्यम प्रकल्पातून जलवाहिनी आणली आहे. यामुळे गेल्या पाच वर्षात सर्व क्षेत्र ओलिताखाली आणले.

विविध फळ पिके

बहुतांश जमीन हलकी आणि मध्यम आहे. डोंगराळ, खडकाळ जमिनीत सुधारणा करण्यासाठी गाळपेर मातीची भर घातली आहे. मुख्य पीक केळी असून, दरवर्षी १५ एकर क्षेत्रावर २५ हजार उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड केली जाते. मृग बहर (जून व जुलैमधील लागवडीच्या बागा) व कांदेबाग (ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये लागवडीच्या बागा) केळीची लागवड करतात. यासोबत लिंबू, पेरू, पपई ही फळ पिके असतात. सोबत खरीप व रब्बी हंगामात मिरची, वांगी, कलिंगड, खरबूज यांसारखी भाजीपाला व फळपिके घेतली जातात.

गेल्या आठ वर्षांत मोहन यांनी नव्या संकल्पना व अन्य बाबींची सांगड घालत केळी शेतीत बदल केला. पूर्वी कंदाच्या साह्याने केली जाणारी लागवड आता उतिसंवर्धित रोपांद्वारे करताना चांगले दर मिळणाऱ्या काळानुसार नियोजन केले जाते. फेरपालटासाठी पपई, कलिंगडाचे बेवड उपयुक्त ठरते.

पीक नियोजनासाठी ज्ञानाची मदत...

कृषी पदवीधर असलेले मोहन हे अभ्यासू असून, वेगवेगळ्या ठिकाणावरून कृषिविषयक माहिती मिळवण्याचा प्रयत्न असतो. त्यासाठी बारामती, पुणे, नाशिक येथील कृषी प्रदर्शनांना भेट देतात. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन शेळीपालन, कलिंगड, मिरची पीक व्यवस्थापनातील बारकावे जाणून घेतले.

पीक व्यवस्थापनात जैविक खते, कीडनाशके, कीडनियंत्रणाच्या विविध पद्धती यांचा समावेश करतात. जैविक, नैसर्गिक व आवश्यकतेनुसार रासायनिक शेती पद्धतींची सांगड घालत कमी खर्चात चांगले उत्पादन मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. जामनेरचे तालुका कृषी अधिकारी अभिमन्यू चोपडे व कृषी सहायक अकिल तडवी यांचे सहकार्य मिळते.

करारासह स्वतःच्या शेतीतून वर्षाला सुमारे ८० लाखांचे उत्पन्न येते. ही एकूण उलाढाल असली तर प्रमुख पीक केळीच्या दरानुसार त्यात कमी अधिक होते. तरिही केळी पिकातून ५० टक्के एवढा नफा मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

Sitaram Wagh
Agriculture Water Management : पाण्याचा काटेकोर वापर ही काळाची गरज

शेती व्यवस्थापनात काटेकोरपणा

एकत्रित कुटुंबामुळे व्यवस्थापन, मार्केटिंग, प्रक्रिया यासाठी अधिक वेळ देता येतो. नव्या तंत्रज्ञान आणि बाबींचा अवलंबही केला जातो.

केळी, कापूस व हळद ही अलीकडे जोखमीची पिके ठरत आहेत. कीडरोगांचा प्रादुर्भाव, नैसर्गिक समस्या यातून उत्पादन खर्च वाढत आहे. तो कमी ठेवण्यासाठी जैविक खते, जैविक कीडनियंत्रणाचा वापर यावर भर दिला जातो.

गादीवाफा पद्धतीने हळद, केळी लागवड करतात. यामुळे कमी अधिक पावसाच्या स्थितीतही पीक टिकाव धरू शकते.

पीक फेरपालट आणि बहुपीक पद्धतीचा अवलंबामुळे जोखीम कमी होते.

शेती १०० टक्के सूक्ष्मसिंचनाखाली आणली आहे. ठिबकद्वारे खते देत असल्याने कार्यक्षमता वाढली असून, खर्च कमी राहण्यास मदत होते.

मोठा ट्रॅक्टर व त्याची अवजारे घेतली आहेत. परिणामी मशागत, पेरणीसह कामे वेळेवर उरकतात. मजुरी खर्चात बचत होते.

बागायतीखालील क्षेत्रात वर्षागणिक वाढ केली. त्यासाठी जलवाहिनीत मोठी गुंतवणूक केली.

खर्च कमी करण्याचा कटाक्ष

स्वतःची शेती करतानाच वाघ बंधूंनी अन्य शेतकऱ्यांची ३५ एकर शेती करारावर घेतली आहे. पीक व्यवस्थापनात आवश्यकतेप्रमाणे बदल केल्यामुळे हळद, कापूस व केळी पिकांत खर्च कमी करतानाच उत्पादकता टिकवली आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन हा मंत्र लक्षात ठेवूनच मोहनराव कामाचे नियोजन करतात.

पीकनिहाय हिशेबाच्या नोंदी ठेवत असल्यामुळे कोणत्या पिकातून, कोणत्या शेतातून किती फायदा किंवा तोटा आला, हे समजते. त्यातील आपल्या हातून घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टींचा आढावा घेतात. भविष्यात या चुका टाळून चांगल्या गोष्टीवर भर दिला जातो.

वार्षिक उत्पन्नानुसार पुढील वर्षभर पिकांचे आर्थिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करतात. आर्थिक शिस्तीवर संदीप यांचा भर आहे

सर्व बंधूंच्या मुलांना शिक्षणासाठी दर्जेदार संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला आहे.

पिकांमधून आलेल्या नफ्यातून शेती सुधारणा, सिंचन स्रोतांचे बळकटीकरण, यंत्रणांची देखभाल, दुरुस्ती या नियमित बाबींसोबत अधिक उत्पादनक्षम गुंतवणुकीवर त्यांचा भर असतो.

उत्पादनातील गुणवत्ता व बचत

उत्तम वाणांचा निवड - उदा. केळीसाठी ग्रॅण्ड नैन, कापसासाठी बीटी २ आणि हळदीचे नवे मागणी असलेले वाण.

जैविक कीडनियंत्रणावर भर - केळी, हळद पिकात जैविक कीडनाशके, खते व अन्य सामग्रीचा वापर.

कापूस पिकाला फक्त एकदाच रासायनिक खतांचा बेसल डोस देतात. नंतर जैविक विद्राव्य खतांचा जमिनीतून आणि फवारणीद्वारे उपयोग करतात. परिणामी, रासायनिक खतांवरील ५० टक्के खर्च कमी झाला आहे.

कापूस पिकात कीडनियंत्रणासाठी पक्षिथांबे उभारणे, एकरी पाच या प्रमाणात कामगंध सापळे या सोबतच एकरी चार पिवळे चिकट सापळे लावतात. यामुळे फवारणीवरील खर्चात ३० टक्क्यांपर्यंत बचत होते.

मोहन यांनी मित्रकीटकांचाही अभ्यास केला आहे. फवारणी करतेवेळी मित्रकीटकांना इजा पोहोचणार नाही, या दृष्टीने काळजी घेतात.

एकाच क्षेत्रात एकच पीक घेण्याऐवजी फेरपालटीवर त्यांचा भर असतो. उदा. जूनमध्ये कापसाची लागवड करतात. डिसेंबरच्या सुरुवातीला कापूस पीक काढून संबंधित क्षेत्र रिकामे केल्यानंतर त्यात इतर फळ, भाजीपाला पिके घेतात. यामुळे गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र थांबण्यास मदत होते. तर जून ते जुलैदरम्यान मृग बहर केळी आणि सप्टेंबर अखेरीस कांदेबाग केळी पिकाची लागवड करतात.

पिकांचे अवशेष शेतातच गाडतात. खोल नांगरणी करण्यावर भर आहे

तज्ज्ञ, खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी, अभ्यासू शेतकरी यांच्या संपर्कात राहून, कृषी क्षेत्रातील माहिती अपडेट करत राहते.

मोहन वाघ, ८६६८८४५५११

Sitaram Wagh
Agriculture Success Story : अडीच हजार झाडांची समृद्धी

थेट विक्रीवर भर

केळी व कापसाची थेट किंवा जागेवर विक्री केली जाते. बाजाराचा अभ्यास करून विक्रीचा निर्णय घेतात.

शेती गावानजीक किंवा रस्त्यानजीक असल्याने केळी काढणी सुकर जाते. कमी मजुरी खर्च लागतो.

केळीची गुणवत्ता राखली जात असल्यामुळे निर्यातदार कंपन्या केळीची खरेदी करतात.

विविध पिकांचे उत्पादन आणि सरासरी दर

एकूण क्षेत्र ६५ एकर (स्वमालकीचे २५ एकर)

पिके

क्षेत्र (एकरांत)

सरासरी उत्पादन (क्विंटल प्रति एकर)

तीन वर्षांतील सरासरी दर (रुपये प्रति क्विंटल)

२०२० २०२१ २०२२

कापूस ५ ते ६ एकर १२ ६००० ११६०० ९०००

केळी १५ एकर २२ ची रास १०५० १५०० ३०००

हळद एक ते दीड एकर १५० (ओली) १० (प्रति किलो) १५ २१

कलिंगड २० ते २२ एकर २८ ६०० ७५० ११००

मका पाच एकर ४० १३०० १७०० २२००

लिंबू

(साई शरबती) एक एकर दर आठवडा २ क्विंटल दर स्थिर नसतो.

पेरू अडीच एकर आठवड्याला तीनशे क्रेट (१८ ते २० किलोचा एक क्रेट) सरासरी दर १५ पर्यंत.

उन्हाळी मिरची पाच एकर २५० १८०० ३५०० ७०००

पपई तीन एकर २० टन प्रति एकर ८०० प्रति टन ११००

प्रति टन १२००

प्रति टन.

विविध पिकांसाठी एकरी खर्च व निव्वळ नफा (रुपये)

पीक खर्च नफा

केळी ६० हजार एक लाख (सरासरी)

कापूस २४ हजार ४० हजार

हळद ५० हजार एक लाख ८० हजार

कलिंगड ७० हजार एक लाख २० हजार

पपई ७० हजार दीड लाख

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com