Marigold Cultivation : सातत्यपूर्ण लागवडीतून मिळवली ‘मास्टरी’

Marigold Farming : नियमित उत्पन्न देणाऱ्या पिकाच्या शोधात होते. कमी खर्चात पण अपेक्षित उत्पन्न देणारे पीक म्हणून झेंडू लागवड करण्याचा निर्णय घेतला.
Marigold Cultivation
Marigold CultivationAgrowon
Published on
Updated on

Success Story of Marigold Farming :

शेतकरी : गजानन सदाशिव पवार

सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे गजानन पवार यांची दोन एकर शेती आहे. त्यापैकी ३० गुंठ्यांत झेंडू, तर उर्वरित क्षेत्रात ऊस पीक घेतले जाते. ऊस पिकातून अठरा महिन्यांतून हाती पैसे मिळत असल्याने नियमित उत्पन्न देणाऱ्या पिकाच्या शोधात होते. कमी खर्चात पण अपेक्षित उत्पन्न देणारे पीक म्हणून झेंडू लागवड करण्याचा निर्णय घेतला.

सन २००७ पासून ३० गुंठ्यांत सातत्यपूर्ण झेंडू लागवड करत आहेत. दरम्यान, फुलबाजारातील अनुभव घेण्याच्या उद्देशाने मुंबई येथील मावसभाऊ विठ्ठल लोखंडे यांच्याकडे गेले. त्यांचे दादर येथील फुलबाजारामध्ये फुलांचे दुकान आहे. त्यानंतर पुन्हा २०१२ पासून फुलशेती करत आहेत. प्रामुख्याने गणपती, दसरा आणि दिवाळी या दरम्यान फुलांना मागणी अधिक असते.

वर्षातून मे (पावसाळी) एकच हंगाम घेतला जातो. त्यानुसार काटेकोर नियोजन करून दर्जेदार फुलांचे उत्पादन घेण्याकडे कल असतो. रोपवाटिकेतून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण तयार रोपांची खरेदी केली जाते. गजानन व त्यांचे पुतणे ऋषिकेश पवार हे दोघेही शेती करतात. फुलाचा हंगाम संपल्यानंतर त्याच क्षेत्रात ऊस लागवड केली जाते.

Marigold Cultivation
Marigold Market : जळगावात झेंडूची आवक कायम

लागवडीची तयारी

झेंडू लागवडीसाठी रोपवाटिकेतून खरेदी केली जाते. त्यासाठी प्रति रोप २ रुपये ६० पैसे खर्च होतो.

लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत केली जाते. तीन डंपिंगचे ट्रेलर शेणखत शेतात वापरले जाते. ते चांगल्या प्रकारे मिसळून बेड तयार केले जातात.

१०ः२६ः२६, १२ः३२ः१६, मॅग्नेशिअम, करंज पेंड या खतांचा बेसल डोस टाकून मातीआड केला जातो.

ठिबकद्वारे बेड चांगले भिजवून घेतले जातात. साधारण दोन ते चार दिवस बेड भिजवला जातो.

नागमोडी पद्धतीने रोपांची लागवड करताना दोन रोपातील अंतर दोन फूट ठेवले जाते.

३० गुंठ्यांत साधारण ६ हजार रोपे लागतात.

खत व्यवस्थापन

रोप लावल्यानंतर तिसऱ्या, चौथ्या दिवशी ह्युमिक ॲसिड, ००ः१२ः६१ याची आळवणी घातली जाते.

सहाव्या दिवशी १९ः१९ः१९ किंवा १३ः४०ः१३ आळवणी घातल्याने वाढ चांगली होते.

फुटवे चांगले येण्यासाठी नवव्या, दहाव्या दिवशी १२ः६१ः०० किंवा १३ः४०ः१३ ची आळवणीचा वापर

१२ व्या दिवशी मॅग्नेशिअम सल्फेट, २४ः२४ः चा बेसल डोसचा वापर

फुलाचे उत्पादन सुरू झाल्यानंतर ५०ः००ः५०, ००ः५२ः३४ याची फवारणी केली जाते. त्यामुळे उत्पादनात वाढ होते.

Marigold Cultivation
Marigold Flower Price : टोमॅटो, कांद्यानंतर आता झेंडू रस्त्यावर फेकण्याची वेळ; सणासुदीत दर पडल्याने शेतकरी चिंतेत

कीड-रोग व्यवस्थापन

हवामान बदलानुसार पिकावर नागअळी, करपा, लाल कोळी आदी कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी दर पंधरा दिवसांनी फवारणीचे नियोजन असते. निरीक्षणानुसार प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक फवारणी केली जाते.

सिंचन व्यवस्थापन

सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. लागवड केल्यानंतर एक दिवसाआड तीन ते चार तास पाणी दिले जाते.

हंगामामध्ये फुलाचे उत्पादन सुरू झाल्यानंतर एक दिवसाआड तीन तास या प्रमाणे ठिबकने सिंचन करण्याचे नियोजन असते.

तापमानातील चढ-उतारानुसार ठिबकचा कालावधी कमी जास्त केला जातो.

उत्पादन, विक्री

लागवडीनंतर साधारण ३५ ते ४० दिवसांनी फुले तोडणीस येतात. एक दिवसाआड फुलांचा तोडा केला जातो. एका तोड्याला ४०० ते ४५० किलो फुलांचे उत्पादन मिळते.

३० गुंठ्यांत सरासरी ६ ते ७ टन फुलाचे उत्पादन हाती येते. गेल्या हंगामात १० रुपयांपासून ते ८० रुपये प्रति किलो असा दर मिळाला. त्याची सरासरी ३० रुपये प्रति किलो मिळाली.

उत्पादित सर्व फुले विक्रीसाठी मुंबई येथील दादर फुलबाजारात पाठवले जातात.

गजानन सदाशिव पवार, ९५१८९०२५८३ (शब्दांकन ः अभिजित डाके)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com