Crop Nutrient Management : पीक उत्पादन वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन

Crop Production : नत्रामुळे पानांमध्ये हरितद्रव्य निर्माण होते, पिके हिरवीगार होतात. पिकांचा दर्जा व उत्पादनात वाढ होते. स्फुरदामुळे पीक काटक व निरोगी बनते. पिकाची गोडी वाढविण्यास, दर्जा सुधारणा आणि उत्पादनवाढीमध्ये पालाश महत्त्वाचे आहे. जास्त चुनखडीयुक्त जमीन असल्यास लोहाची कमतरता दिसते.
Crop Nutrient Management
Crop Nutrient ManagementAgrowon

डॉ. पपिता गौरखेडे

Crop Management :

मुक्त चुनखडीचे प्रमाण

मुक्त चुनखडीचे प्रमाण हे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास (कमी), तर ५ ते १० टक्के (मध्यम), १० ते १५ टक्के (जास्त), आणि १५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास पिकास हानिकारक ठरते.

जास्त चुनखडीयुक्त जमीन असल्यास लोहाची कमतरता येते. चुनखडीयुक्त जमिनीचा घनता वाढते, घडण, संरचना कठीण बनते. हुमणी, उधई आणि सूत्रकृमी या किडीच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते. सामू विम्लधर्मीय होतो. क्षारता १.० डेसी.सी./मीटरपेक्षा जास्त असते.

चुनखडीयुक्त जमिनीत नत्र, अमोनिअम सल्फेट आणि स्फुरद हे डायअमोनियम फॉस्फेटद्वारे द्यावे. पीएसबी या जिवाणू खतांचा वापर बीजप्रक्रियेद्वारे किंवा शेणखतातून करावा.

ठिबकद्वारे स्फुरद नियंत्रित प्रमाणात फॉस्फरीक ॲसिडद्वारे द्यावे. तसेच चुनखडी प्रतिकारक पिके तूर, पपई, गहू ,वांगे, कांदा, अंजीर, आवळा, सीताफळ या पिकांची लागवड करावी.

चुनखडीयुक्त जमिनीची संरचना मऊ करण्याकरिता मळी कंपोस्ट खताचा वापर करावा. गंधक शेणखतात मिसळून जमिनीत पेरणीपूर्वी एक महिना अगोदर द्यावे.

वर्गवारी कमी मध्यम अधिक

मुक्त

चुन्याचे प्रमाण < ५.०० ५.०० ते १०.०० > १०.००

उपलब्ध नत्र

पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांपैकी नत्र हे पिकांना सर्वांत जास्त प्रमाणात लागणारे अन्नद्रव्य आहे.

नत्रामुळे पानांमध्ये हरितद्रव्य निर्माण होते. पिकांचा दर्जा व उत्पादनात वाढ होते.

जमिनीमधील उपलब्ध नत्राची सर्वसाधारण पातळी १८१ ते ४२० किलो प्रति हेक्टर असल्यास जमिनीत नत्र पुरेसा आहे.

ज्या जमिनीमध्ये शेणखत व इतर सेंद्रिय पदार्थाचा नियमित व भरपूर वापर केला जातो, अशा जमिनीत उपलब्ध नत्राचे प्रमाण चांगले असते.

उपलब्ध स्फुरद

स्फुरदामुळे पीक काटक व निरोगी बनते.

फुले व फलधारणा चांगली होते, दर्जेदार उत्पादन मिळते. जमिनीमधील उपलब्ध स्फुरदाची सर्वसाधारण पातळी १५ ते २१ किलो प्रति हेक्टरी असल्यास जमिनीत स्फुरद पुरेसा आहे. ज्या जमिनीमध्ये शेणखत व इतर पदार्थांचा वापर केला जातो, अशा जमिनीत उपलब्ध स्फुरदाचे प्रमाण चांगले असते.

उपलब्ध पालाश

पालाशमुळे पीक काटक व रोगप्रतिकारक क्षमता वाढते. पालाश शर्करा निर्मितीमध्ये साह्य करते.

पिकाची गोडी वाढविण्यास, दर्जा सुधारणा आणि उत्पादनवाढीमध्ये महत्त्व आहे.

अवर्षण परिस्थितीत फुले व फळधारणा चांगली होते, दर्जेदार उत्पादन मिळते.

जमिनीमधील उपलब्ध पालाशची सर्वसाधारण पातळी १५१ ते २०० किलो प्रति हेक्टर असल्यास जमिनीत पालाश पुरेसा असतो. महाराष्ट्रातील बहुतांश जमिनीत सर्वसाधारण मर्यादेपेक्षा जास्त मात्रा आढळते.

Crop Nutrient Management
Nutrient Management : ठिबक सिंचनाद्वारे खोडवा उसाचे पाणी, अन्नद्रव्य व्यवस्थापन

दुय्यम अन्नद्रव्यांचे महत्त्व

माती परीक्षण अहवालानुसार पीक पोषणात मुख्य अन्नद्रव्यांइतकेच महत्त्व दुय्यम अन्नद्रव्यांनासुद्धा आहे. यामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि गंधक यांचा समावेश होतो. जमिनीमध्ये या अन्नद्रव्याची उपलब्धता नैसर्गिकरीत्या उपलब्ध असणाऱ्या कर्ब, हायड्रोजन आणि ऑक्सिजन याप्रमाणेच होत असे. वेगळ्या खतांच्या स्वरूपात देण्याची आवश्यकता नव्हती. परंतु अलीकडे या अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होत असून वर खतांच्या स्वरूपात ते वापरावे लागत आहे.

कॅल्शिअम

खडक खनिजापासून तयार झालेल्या जमिनीमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण ०.१ ते २५.० टक्के असते.

कमी पाऊस आणि अधिक तापमान असलेल्या हवामान पट्ट्यातील मुख्यत्वे चुनखडीयुक्त जमिनीमध्ये कॅल्शिअम अधिक प्रमाणात उपलब्ध असते.

आम्लधर्मीय सामू असलेल्या लाल-तांबड्या जमिनीमध्ये कॅल्शिअमची कमतरता असते.

कॅल्शिअम वनस्पतीच्या वाढीकरिता अत्यंत जरुरी आहे. वनस्पती जमिनीतून भरपूर कॅल्शिअम वापरतात. हा कॅल्शिअम मुख्यतः पानात आढळतो. फळे व बियांमध्ये त्यामानाने यांचे प्रमाण कमी असते. पिकांमध्ये कॅल्शिअम पेक्टेट स्वरूपात आढळते. दोन पेशी जोडण्यास जो पदार्थ वनस्पती वापरतात, तो कॅल्शिअम पेक्टेटने बनलेला असते. वनस्पती जमिनीतून मिळणाऱ्या कॅल्शिअम विद्राव्य स्वरूपात वापरतात.

मॅग्नेशिअम

चिकणमातीयुक्त जमिनीमध्ये मॅग्नेशिअमचे प्रमाण वालुकामय जमिनीपेक्षा अधिक असते. ज्या प्रकारच्या खनिजापासून मातीची निर्मिती झाली त्यावर एकूण मॅग्नेशिअमचे प्रमाण अवलंबून असते. पानात व बियात भरपूर प्रमाणात मॅग्नेशिअम आढळते. त्या खालोखाल झाडांच्या देठात क्लोरोफीलच्या प्रत्येक रेणूमध्ये मॅग्नेशिअमचा अणू असतो.

उपलब्ध गंधक

खनिजापासून तयार झालेल्या विविध पायाराइट, स्केलेराइट यामध्ये ०.००८ ते ०.१३६ टक्के गंधक आहे. सर्वसाधारण हलक्या,उथळ आणि वालुकामय जमिनीमध्ये उपलब्ध गंधकाची मात्रा कमी असते.

भारतातील ४६ टक्के जमिनीमध्ये गंधकाची कमतरता दिसून येते. माती परीक्षणावर आधारित गंधकाचा वापर केल्याने पिकांची उत्पादकता २५ ते ३० टक्क्यांनी वाढते.

जमिनीमध्ये गंधकाची सर्वसाधारण मर्यादा १० ते २० पीपीम एवढी आहे. या मर्यादेपेक्षा जमिनीत गंधक कमी असल्यास, त्या प्रमाणात गंधकयुक्त खत वापराची शिफारस केली जाते. वनस्पतीमध्ये गंधक हे प्रथिने,जीवनसत्वे आणि स्निग्ध पदार्थामध्ये आढळते. हा तेलयुक्त पदार्थ वनस्पतींना तिखट वास प्रदान करते. उदा. कांदा, लसूण.

गंधकाची हरितद्रव्ये निर्माण करण्यात मदत होते. कारण गंधकाचा अभाव झाल्यास पाने पिवळी पडतात. फळे पिवळसर हिरवी दिसतात. वाढ कमी होते, रंग बदलतो. आतील गर कमी होतो.

Crop Nutrient Management
Soil Nutrient Management : जमिनीमध्ये संतुलित अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन

सूक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्त्व

सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापर न केल्यास होणारे दुष्परिणाम ताबडतोब दृश्‍य स्वरूपात नसतात, मात्र त्यांची कमतरता नुकसानकारक ठरू शकते. अल्प प्रमाणात लागणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे पीक पोषणातील कार्य मुख्य अन्नद्रव्यांइतकेच महत्त्वाचे आहे. नत्र, स्फुरद आणि पालाश योग्य प्रमाणात वापरून देखील पिकापासून पूर्ण क्षमते एवढे उत्पादन मिळत नाही कारण प्रत्येक अन्नद्रव्याचे कार्य हे विशिष्ट प्रकारचे असते. योग्य प्रमाणात आणि कार्यक्षम स्वरूपात सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापरासाठी नियोजन करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील जमिनीमध्ये ५६.४ टक्के जमिनीत उपलब्ध जस्त, ३९.८ टक्के जमिनीत उपलब्ध लोह आणि ५६.७ टक्के जमिनीत उपलब्ध बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे.

मराठवाड्यातील माती परीक्षणाच्या अहवालानुसार ३६.४० टक्के जमिनीत जस्त, २६.०० टक्के जमिनीत लोह आणि ३६.०० टक्के जमिनीत उपलब्ध बोरॉनची कमतरता दिसून आली. मात्र उपलब्ध मँगेनीज, तांबे व मोलाब्द पुरेशा प्रमाणात पिकांना पुरविण्याची क्षमता मराठवाड्यातील जमिनीमध्ये आहे.

मराठवाड्यातील जमिनीमध्ये एकापेक्षा अधिक सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत असून माती परीक्षण अहवालानुसार त्यांचा योग्य प्रमाणात वापर पीक उत्पादनाच्या व शेतमालाची प्रत वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.

मुख्य अन्नद्रव्यांची जमिनीतील उपलब्धतेनुसार वर्गवारी व माती परीक्षणावर आधारित खतांच्या मात्रा

अन्नद्रव्याचे प्रमाण सेंद्रीय कर्ब (%) जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य (किलो प्रति हेक्टर) खताच्या शिफारशी

नत्र स्फुरद पालाश

अत्यंत कमी ०.२० पेक्षा कमी १४० पेक्षा कमी ७ पेक्षा कमी १०० पेक्षा कमी शिफारशीत खत मात्रेपेक्षा ५० % जास्त

कमी ०.२१ ते ०.४० १४१ ते २८० ८ ते १४ १०१ ते १५० शिफारशीत खत मात्रेपेक्षा २५ %जास्त

मध्यम ०.४१ ते ६० १८१ ते ४२० १५ ते २१ १५१ ते २०० शिफारशीत खत मात्रा

थोडेसे जास्त ०.६१ ते ८० ४२१ ते ५६० २२ ते २८ २०१ ते २५० शिफारशीत खत मात्रा

जास्त ०.८१ ते १.०० ५६१ ते ७०० २९ ते ३५ २५१ ते ३०० शिफारशीत खत मात्रेपेक्षा २५ % कमी

अत्यंत जास्त १.०० पेक्षा जास्त ७०० पेक्षा जास्त ३५ पेक्षा जास्त ३०० पेक्षा जास्त शिफारशीत खत मात्रेपेक्षा ५०% कमी

सूक्ष्म अन्नद्रव्याची जमिनीतील उपलब्धतेनुसार वर्गवारी व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या प्रमाणावरून खतांचा वापर (प्रति दशलक्ष भाग – पीपीएम)

सूक्ष्म अन्नद्रव्य कमी (पीपीएम) पुरेसे (पीपीएम) कमी असल्यास उपाय

लोह / फेरस २.५ पेक्षा कमी २.५ ते ४.५ १०.२५ किलो प्रति हेक्टरी फेरस सल्फेट जमिनीतून द्यावे किंवा ०.५ ते १ % हिराकसची फवारणी

मंगल / मँगेनीज २.० पेक्षा कमी २.० ते ५.० १० ते २५ किलो प्रति हेक्टरी मँगेनीज सल्फेट जमिनीतून किंवा १ % मँगेनीज सल्फेटची फवारणी

जस्त / झिंक ०.६ पेक्षा कमी ०.६ ते १.२ २० ते ४० किलो प्रति हेक्टरी झिंक सल्फेट जमिनीतून द्यावे किंवा ०.५ ते १ % झिंक सल्फेटची फवारणी

तांबे / कॉपर ०.३ पेक्षा कमी ०.३ ते ०.५ ५ ते १० किलो प्रति हेक्टरी मोरचूद / कॉपर सल्फेट जमिनीतून द्याव ेकिंवा ०.४ % मोरचूदची फवारणी

बोरॉन ०.१ पेक्षा कमी ०.१ ते ०.५ ५ ते १० किलो प्रति हेक्टरी बोरॅक्स जमिनीतून द्यावे किंवा १ % सोल्यु बोअरची फवारणी

मोलाब्द/ मॉलीब्डेनम ०.०३ पेक्षा कमी ०.०३ ते ०.०६ ०.२५ ते ०.५० किलो प्रति हेक्टरी सोडिअम मॉलिब्डेनम जमिनीतून द्यावे

टीप : १) सर्वसाधारणपणे वरील सूक्ष्म अन्नद्रव्ये मुख्य अन्नद्रव्यांच्या खतासोबत मिसळून द्यावीत.

२) विशेषतः चुनखडी असणाऱ्या जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्य खते दिल्यानंतर त्यातील बराचसा भाग जमिनीत बद्ध होतो. त्यामुळे पिकास फारच कमी उपलब्ध होतो. म्हणून चुनखडीचे प्रमाण जास्त असणाऱ्या जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्ये चिलेटेड स्वरूपात द्यावीत. फवारणीद्वारे याचा वापर करता येतो.

डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६,

(मृद्‍ विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com